जिल्ह्यात ८ ज्येष्ठांचा  कोरोनामुळे मृत्यू; दिवसभरात १ हजार ३५४ बाधित

नाशिक : जिल्ह्यात मंगळवारी (ता. १६) दिवसभरात आठ कोरोना बाधितांचा उपचार सुरू असताना मृत्‍यू झाला. यात, नाशिक शहरातील पाच, नाशिक ग्रामीणमधील एक आणि मालेगावच्‍या दोघांचा समावेश असून, सर्वांचे वय ६५ वर्षांपेक्षा जास्त आहे. दरम्‍यान, जिल्ह्यात दिवसभरात १ हजार ३५४ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. तर ८०२ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. यातून ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण संख्येत ५४४ ने वाढ झाली असून, सद्यःस्‍थितीत जिल्ह्यात ९ हजार ४११ बाधितांवर उपचार सुरु आहेत. 

नाशिक शहरात पवननगर, सिडको येथील ७४ वर्षीय व ६७ वर्षीय पुरुष, जुने सिडकोतील ८२ वर्षीय पुरुष, उपनगर परिसरातील ७२ वर्षीय महिला, अशोका मार्ग परिसरातील ७१ वर्षीय पुरुष बाधिताचा, मालेगावला ८० वर्षिय पुरूष व सोयगाव येथील ७६ वर्षीय महिला, तसेच नांदगाव बुद्रूक (ता. इगतपुरी) येथील ७० वर्षीय महिलेचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. नाशिक शहरात ९४४, नाशिक ग्रामीणमधील २७९, मालेगावच्‍या ९६ तर, जिल्‍हा बाहेरील ३५ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. तर, बरे झालेल्‍या रुग्‍णांमध्ये नाशिक शहरातील ४४०, नाशिक ग्रामीणमधील २३५, मालेगावच्‍या ११६ व अन्य जिल्ह्यातील अकरा रुग्‍णांचा समावेश आहे. 

 

हेही वाचा - नाशिकमधील धक्कादायक घटना! कुटुंबाचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न; पोलीस तपास सुरू

चार हजाराहून अधिक अहवाल प्रलंबित 

जिल्ह्यात सायंकाळी उशीरापर्यंत ४ हजार ०३९ रुग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते. यापैकी नाशिक शहरातील १ हजार ९६८, तर नाशिक ग्रामीणमधील १ हजार ५४७, मालेगावच्‍या ५२४ रुग्‍णांना अहवालाची प्रतिक्षा होती. दिवसभरात जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात १ हजार ६३२ संशयित दाखल झाले आहेत. यामध्ये नाशिक महापालिका हद्दीतील १ हजार ५३८ रुग्‍ण असून, जिल्‍हा रुग्‍णालय व डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात प्रत्‍येकी चार रुग्‍ण दाखल झाले आहेत.  

हेही वाचा - दुर्दैवी अपघात आणि महापालिका कर्मचाऱ्याचे अख्खे कुटुंब उध्वस्त; ५ वर्षीय चिमुरडा ठार, पत्नी गंभीर