जिल्ह्यात ॲक्‍टिव्‍ह रूग्‍ण संख्येत ५९ ने वाढ; दिवसभरात ३५० कोरोनाबाधित

नाशिक : जिल्‍ह्‍यात ॲक्‍टिव्‍ह रूग्‍ण संख्या पुन्‍हा वाढू लागली आहे. शुक्रवारी (ता.२७) दिवसभरात ३५० कोरोना बाधित आढळून आले असून, २८७ रूग्‍णांनी दिवसभरात कोरोनावर मात केली आहे. चार रूग्‍णांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला. यातून ॲक्‍टिव्‍ह रूग्‍ण संख्येत ५९ ने वाढ झाली असून, सद्य स्‍थितीत जिल्‍ह्‍यात २ हजार ७६४ रूग्‍णांवर उपचार सुरू आहेत. 

बाधितांमध्ये नाशिक शहरातील २१६

शुक्रवारी जिल्‍ह्‍यात आढळलेल्‍या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरातील २१६, नाशिक ग्रामीणमध्ये १११, मालेगावला १४, जिल्‍हाबाहेरील नऊ रूग्‍णांचे अहवाल पॉझिटीव्‍ह आले आहेत. बरे झालेल्‍या रूग्‍णांमध्ये नाशिक शहरातील २१९, नाशिक ग्रामीणमधील ५६, मालेगावचे पाच, जिल्‍हाबाहेरील सात रूग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरित्‍या मात केली आहे. चार मृत्‍यूंमध्ये नाशिक ग्रामीणमधील तीन तर जिल्‍हाबाहेरील एका रूग्‍णाचा मृत्‍यू झाला आहे. नाशिक ग्रामीणमध्ये सटाण्यातील डांगसौंदाणे येथील ६७ वर्षीय महिला, मोहाडी (ता.दिंडोरी) येथील ७५ वर्षीय पुरूष, येवल्‍यातील ४८ वर्षीय महिला रूग्‍णाचा मृत्‍यू झाला आहे. जळगाव येथील ५४ वर्षीय पुरूष रूग्‍णाचा नाशिकमध्ये उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला आहे. 

हेही वाचा - खेळ कुणाला दैवाचा कळला! लेकराचं तोंड बघायच्या आधीच वडिल देवाला प्रिय; गावात भयाण शांतता

एकूण आकडा १ लाख १७२

यातून जिल्‍ह्‍यातील कोरोना बाधितांचा एकूण आकडा १ लाख १७२ झाला असून, यापैकी ९५ हजार ६२६ रूग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरित्‍या मात केली आहे. १ हजार ७८२ रूग्‍णांचा मृत्‍यू झाला आहे. शुक्रवारी दिवसभरात दाखल रूग्‍णांमध्ये नाशिक महापालिका रूग्‍णालये व गृहविलगीकरणात १ हजार २५३, नाशिक ग्रामीण रूग्‍णालये व गृहविलगीकरणात ४३, मालेगाव महापालिका रूग्‍णालये व गृहविलगीकरणात सहा, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात सात, जिल्‍हा रूग्‍णालयात सहा रूग्‍ण दाखल झाले आहेत. 

हेही वाचा - क्रूर नियती! नातेवाईकांसोबत गणेशचे ते फोटो सेशन ठरले शेवटचे; घटनेने परिसरात हळहळ