जिल्ह्यात ॲक्‍टिव्‍ह रूग्‍णांची संख्या ३ हजाराहून अधिक; दिवसभरात सहा मृत्‍यू 

नाशिक : जिल्‍ह्‍यात उपाचार घेणाऱ्या कोरोना रूग्‍णांची संख्या पुन्‍हा वाढत आहे. बुधवारी (ता.२) दिवसभरात ४०३ रूग्‍णांचे अहवाल पॉझिटीव्‍ह आले, तर २०८ रूग्‍णांनी कोरोनावर मात केली. दिवसभरात सहा रूग्‍णांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला. यातून ॲक्‍टीव्‍ह रूग्‍ण संख्या १८९ ने वाढली असून, जिल्‍हाभरात उपचार घेत असलेल्‍या कोरोना बाधितांची एकूण संख्या ३ हजार ०२२ झाली आहे.

 बाधितांमध्ये नाशिक शहरातील १९३

बुधवारी (ता.२) आढळलेल्‍या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरातील १९३, नाशिक ग्रामीणमधील १९१, मालेगावचे १४ तर जिल्‍हाबाहेरील पाच रूग्‍णांचे अहवाल पॉझिटीव्‍ह आले आहेत. बरे झालेल्‍या रूग्‍णांमध्ये नाशिक शहरातील ९५, नाशिक ग्रामीणमधील ९८, मालेगावचे चार तर जिल्‍हाबाहेरील अकरा रूग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरित्‍या मात केली आहे. सहा मृतांमध्ये चार नाशिक शहरातील तर दोन नाशिक ग्रामीणमधील रूग्‍ण आहेत. या मृतांमध्ये शहरातील गंगापूर रोड जिहान सर्कल परीसरातील ५२ वर्षीय महिला, सराफ बाजारातील ७९ वर्षीय महिला, पंचक परीसरातील ७२ वर्षीय पुरूष, सातपूरमधील ६८ वर्षीय पुरूष रूग्‍णाचा समावेश आहे. तर नाशिक ग्रामीणमध्ये भगूर येथील ७० वर्षीय पुरूष, मिलींदनगर (ता.निफाड) येथील ४४ वर्षीय पुरूष रूग्‍णाचा मृत्‍यू झाला आहे. 

हेही वाचा > नियतीची खेळी! लेकाला जेवण घेऊन माऊली आली शेतात; आणि घरी घडले भलतेच

एकूण बाधितांचा आकडा १ लाख ०१ हजार

दरम्‍यान जिल्‍ह्‍यातील एकूण कोरोना बाधितांचा आकडा १ लाख ०१ हजार ८२२ झाला असून, यापैकी ९६ हजार ९९६ रूग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरित्‍या मात केली आहे. मृतांचा आकडा अठराशेपार गेला असून, आतापर्यंत १ हजार ८०४ रूग्‍णांचा मृत्‍यू झाला आहे. सध्या जिल्‍ह्‍यात ३ हजार ०२२ बाधितांवर उपचार सुरू आहेत. दिवसभरात दाखल रूग्‍णांमध्ये नाशिक महापालिका रूग्‍णालये व गृहविलगीकरणात ९११, नाशिक ग्रामीण रूग्‍णालये व गृहविलगीकरणात ७०, मालेगाव महापालिका रूग्‍णालये व गृहविलगीकरणात १०, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात पाच आणि जिल्‍हा रूग्‍णालयात पाच रूग्‍ण दाखल झाले आहेत. सायंकाळी उशीरापर्यंत ६०६ अहवाल प्रलंबित आहेत. यापैकी नाशिक शहरातील ३६६, नाशिक ग्रामीणमधील १९०, मालेगाव महापालिका हद्दीतील ५० रूग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.  

हेही वाचा > क्रूर नियती! तो' एक सेल्फीचा मोह अनावर; अन् माऊली लेकरांपासून दुरावली कायमची