जिल्‍ह्यात आज कोरोनाचे १८१ रुग्ण पॉझिटीव्‍ह, बरे झाले २३४ तर चार मृत्‍यू 

नाशिक : जिल्‍ह्‍यात उपचार घेत असलेल्‍या कोरोना बाधितांची संख्या ५७ ने घटली आहे. शुक्रवारी (ता.८) दिवसभरात १८१ रूग्‍णांचा अहवाल पॉझिटीव्‍ह आला होता. दिवसभरात २३४ रूग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरित्‍या मात केली आहे. चार बाधितांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला असून, हे सर्व नाशिक ग्रामीण भागातील आहेत. सद्य स्‍थितीत जिल्‍ह्‍यात १ हजार ६४६ बाधितांवर उपचार सुरू आहेत. 

नाशिक शहरातील १४१ रुग्ण बरे

शुक्रवारी (ता.८) आढळलेल्‍या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरातील १२०, नाशिक ग्रामीणमधील ५४, मालेगावचे पाच, तर जिल्‍हाबाहेरील दोन रूग्‍णांचा अहवाल पॉझिटीव्‍ह आला आहे. बरे झालेल्‍या रूग्‍णांमध्ये नाशिक शहरातील १४१, नाशिक ग्रामीणमधील ८६, मालेगावचे ४, जिल्‍हाबाहेरील तीन रूग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरित्‍या मात केली आहे. चार रूग्‍णांचा मृत्‍यू झाला असून, हे सर्व नाशिक ग्रामीणमधील आहेत. दिवसभरात दाखल संशयितांमध्ये नाशिक महापालिका रूग्‍णालये व गृहविलगीकरणात १ हजार ०८४, नाशिक ग्रामीणमध्ये १६, मालेगावला आठ, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात चार, जिल्‍हा रूग्‍णालयात चार संशयित दाखल झाले आहेत. सायंकाळी उशीरापर्यंत १ हजार ८३५ अहवाल प्रलंबित होते. दरम्‍यान जिल्‍ह्‍यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या १ लाख १२ हजार ०२० झाली असून, यापैकी १ लाख ८ हजार ३६६ रूग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. २ हजार ००८ रूग्‍णांचा आतापर्यंत मृत्‍यू झाला आहे. 

हेही वाचा > नियतीची खेळी! एका मित्राला लागली हळद ,तर दुसऱ्याला दिला अग्नि; अक्षयच्या अवेळी जाण्याने परिसरात हळहळ

हेही वाचा > माहेरहून सासरी निघालेली विवाहिता चिमुकलीसह प्रवासातच गायब; घडलेल्या प्रकाराने कुटुंबाला धक्काच