जीवाची पर्वा न करता ‘ती’ शिरली मृत्यूच्या घरात! जरी हात होरपळला तरी हिम्मत कायम

सायखेडा (जि.नाशिक) : वेळ दुपारची... कुटुंबातील सर्व नातेवाईकाच्या लग्नाला जातात. यावेळी शिला भागवत एकट्याच घरी असतात. दुपारच्या वेळी आपल्या घरगुती कामात व्यस्त असताना शेजारी राहणाऱ्या ऐशी वर्षाच्या विठाबाई ईश्वरे यांची भेदरलेल्या आवाजात हाक ऐकू येते. आणि मग जीवाची पर्वा न करता त्या शिरतात मृत्यूच्या घरात...

जीवाची पर्वा न करता शिरली मृत्यूच्या घरात!

शिंगवे (ता.निफाड) येथील मारूती मंदीर परीसरात शिला संजय भागवत राहत असून घरचे सर्व नातेवाईकाच्या लग्नाला गेलेले असतानाच शिला एकट्याच घरी असतात. दुपारची वेळ असल्याने आपल्या घरगुती कामात व्यस्त होत्या.आजुबाजूचे रहिवाशी शेतीच्या कामासाठी शेतात गेलेली असतात.शेजारीच राहणाऱ्या ऐशी वर्षाच्या आजीबाई विठाबाई ईश्वरे यांच्या घरातून भेदरलेल्या आवाजात हाक ऐकू येते. आजी शिला यांना जोरात हाका मारू लागतात. शिला सुध्दा हातातील काम टाकून घरातून पळतच बाहेर येतात. अचानक घडलेल्या घटनेने वृध्देच्या तोंडातून आवाज निघत नाही. त्या फक्त जळणाऱ्या गॅस सिलेंडरकङ बोट दाखवतात. शिला भागवत पेटलेल्या गॅसकडे पाहते आणि समोरचा प्रकार पाहून घाबरून काय करावं ते कळत नाही. गॅसच्या गळतीने वृध्देचे घर उग्र वासाने भरून जाते. तरी पण शिला हिम्मत दाखवून आणि जीवाची पर्वा न करता जळणाऱ्या  सिलेंडर जवळ जाते आणि पेटलेल्या सिलेंडरच्या रेग्यूलेटरचे बटण बंद करते.

हेही वाचा - सिव्हील हॉस्पीटलमधून बालिका अपहरण प्रकरणी अपहरणकर्त्याकडून खुलासा! वेगळेच सत्य समोर

 तिच्या समय सुचकतेने मोठा अनर्थ टळला

गरम रेग्यूलेटर बाजूला काढून फेकते. गॅसमधून निघणारा जाळ थांबतो. परंतू तिचा हात थोडाफार होरपळतो. तिच्या समय सुचकतेने मोठा अनर्थ टळला अन्यथा मोठा विध्वंस झाला असता. एक वृद्धेच्या घरात गॅस गळतीने सिलेंडर पेट घेतला असता शेजारी राहणाऱ्या शिला संजय भागवत यांनी जीवाची पर्वा न करता पेटता रेग्यूलेटर बंद करून बाहेर काढतात आणी आग विझवतात त्यांच्या धाडसाने मोठा अनर्थ टळला. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हेही वाचा - अख्खे गाव हळहळले! दोन सख्ख्या बहिणींच्या एकत्रच निघाल्या अंत्ययात्रा; पाच मुलांमधून आता तिघांचाच आधार