जुन्या वादातून घर जाळण्याचा प्रयत्न; तडीपारीचा अर्ज केल्याच्या संशयावरून मारहाण 

नाशिक : आग का लावली विचारले असता चौघांनी घरात घुसून मारहाण करत जखमी केले. परिसरातील नागरिकांनी त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

जुन्या वादात घर जाळण्याचा प्रयत्न 

जुन्या वादातून आग लावून घर जाळण्याचा चौघांनी प्रयत्न केला. त्याचा जाब विचारला असता, चेतन रामकुवर बिगानिया (वय ३३, रा. महालक्ष्मी चाळ) याला शिवीगाळ करत मारहाण करत जखमी करण्यात आले. चेतन बिगानिया मंगळवारी (ता. ८) रात्री घरात टीव्ही पाहत असताना बंद दाराखालून धूर येत असल्याने त्यांनी दार उघडून पाहिले. दारास आग लागलेली होती, तर संशयित अर्जुन राजू लोट, करण राजू लोट (रा. महालक्ष्मी चाळ) तसेच अक्षय रामपाल लोट आणि कमल ऊर्फ बाबू रामपाल लोट (रा. ५४ क्वार्टर, कथडा) असे चौघे बाहेर उभे दिसले. आग का लावली विचारले असता चौघांनी घरात घुसून मारहाण करत चेतनचे भाऊ अर्जुन बिगानिया आणि राहुल बिगानिया यांनाही मारहाण करत जखमी केले. परिसरातील नागरिकांनी त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

हेही वाचा - जन्मतः अंध घुबडाची श्रुती बनली "आई-बाबा"! कोरोना काळातील एक अनोखी कथा अन् प्रेमही​

वादाची कुरापत काढत तक्रारदाराचे घर जाळण्याचा प्रयत्न

पोलिसांत संशयितांविरुद्ध तडीपारीचा अर्ज केल्याच्या संशयावरून रविवारी (ता. ६) संशयितांनी चेतनला शिवीगाळ केली होती. त्या वेळी तक्रारदार यांनी अर्ज केला नसल्याचे सांगत संशयितांची समजूत काढून तेथून निघून गेले. संशयितांनी मंगळवारी (ता. ८) रात्रीच्या सुमारास त्याच वादाची कुरापत काढत तक्रारदाराचे घर जाळण्याचा प्रयत्न केला. 

हेही वाचा - ह्रदयद्रावक! जीवलग मित्राच्या मृत्यूनंतर अवघ्या दोन दिवसातच निघाली अंत्ययात्रा; अख्खे गाव हळहळले