
नाशिक : पत्नी जेनेलियाशी वाद झाल्यानंतर तिची समजूत काढण्यासाठी ‘प्लॅन ए व प्लॅन बी’ नेमका काय प्रकार आहे, असे विचारले असता रितेश म्हणाला की, ‘प्लॅन ‘ए’मध्ये मी सॉरी म्हणतो आणि प्लॅन ‘बी’मध्ये व्हेरी व्हेरी सॉरी असे म्हणतो’ हे उत्तर देताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.
नाशिकमधील एबीबी सर्कलजवळील ‘मुहूरत’ या भव्य फॅमिली शॉपिंग मॉलच्या उद्घाटनासाठी नाशिकमध्ये आलेल्या रितेशने पत्रकार व उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी स्टाइल स्टेटमेंटविषयी सांगताना रितेश आणि जेनेलिया म्हणाली की, दिवाळीत कृर्ता, पायजमा आणि साडी या आउटफिटला आम्ही पसंती देऊ.
तसेच यावेळी रितेश ने चित्रपट विश्वात सध्या सुरु असलेल्या बाॅयकॉट ट्रेंडवरही भाष्य केलं, रितेश म्हणाला…लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. जर एखाद्या चित्रपटाला ‘बॉयकॉट’ केले जात असेल तर तो त्याचा अधिकार आहे. प्रत्येकाचा बघण्याचा वेगळा द़ृष्टिकोन असतो. त्यामुळे चित्रपटांबाबत एखादा ट्रेंड चालविला जात असेल तर तो त्यांच्या मानसिकतेचा भाग आहे, असे स्पष्ट मत अभिनेता रितेश देशमुख याने व्यक्त केले.
हेही वाचा :
- ‘धनुष्यबाण’ गोठविल्याने शिवसेना संपणार नाही
- सातारा : डेंग्यू, चिकुणगुणियाच्या रूग्णसंख्येत वाढ; जिल्हावासियांना धास्ती
- आरटीओ प्रशासन : नियम धाब्यावर बसवत अवैध वाहतूक सर्रास
The post जेनेलियाशी वाद झाल्यानंतर रितेश काय करतो? त्यानेच सांगितले ‘प्लॅन ए व प्लॅन बी’ appeared first on पुढारी.