जेलमधून सुटलेल्या ‘भाईंचे’ वेलकम सेलिब्रेशन पडले भारी! मुख्य रस्त्यावर गोंधळ; 10 कार जप्त

नाशिक : कोविड संक्रमणामुळे जनजीवन धोक्यात आले असतानाच खूनाच्या प्रयत्न करणाऱ्या गुन्ह्यातील आठ साथीदार कारागृहातून सुटल्याचे जोरदार सेलिब्रेशन साजरे करणे अंगलट आले आहे. या घटनेने गुरूवारी (ता.१) दुपारी जेल रोडला मध्यवर्ती कारागृहासमोरील मुख्य रस्त्यावर गोंधळ निर्माण झाला होता.

काय घडले नेमके?

मध्यवर्ती कारागृहासमोरील मुख्य रस्त्यावर भाईंचे' वेलकम सेलिब्रेशन
नाशिक रोड पोलिसांनी ५० जणांविरूद्ध गुन्हा दाखल करीत १७ जणांना अटक केली .फॉरच्युनर सह दहा वाहने जप्त करण्यात आली आहे. या घटनेने गुरूवारी दुपारी जेल रोडला मध्यवर्ती कारागृहासमोरील मुख्य रस्त्यावर गोंधळ निर्माण झाला होता.

समर्थकांचा मुख्य रस्त्यावर गोंधळ

उपनगर पोलिस ठाण्यात २०१६ मध्ये खून, खूनाचा प्रयत्न या प्रकरणात भांदवि ३०२,३०७ अन्वये गुन्हा (रजिस्टर क्रमांक ३५७) अन्वये आठ संशयित नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात होते. न्यायालयाच्या आदेशाने हे संशयित काल बाहेर येणार म्हणून त्यांच्या समर्थकांनी दुचाकी-चारचाकी वाहनासह जेल रोड मुख्य रस्त्यावर जमले. कारागृहाबाहेर फटाक्यांची आतषबाजी करत मिरवणूक काढली. यामुळे जेलरोडवरील वाहतूक ठप्प झाली. या सेलिब्रेशनचे वृत्त पोलिसांनी धाव घेऊन कारवाईस प्रारंभ केला. 

हेही वाचा - आंदोलनास बसलेल्या कोरोनाबाधिताचा मृत्यू प्रकरण : दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची पत्नीची मागणी

गुन्हा दाखल
कोविड संक्रमणाच्या काळात सर्वसामान्यांच्या जिवितास धोका उत्पन्न होईल असे कृत्य केल्याप्रकरणी भांदवि कायदा कलम १४३, १४७, १४९, ३४१, २६८, २६९, २७०, २८६, १८८, साथरोग प्रतिबंध अधिनियम कलम ३, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन सन २००५ चे कलम ५१ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

हेही वाचा - दशक्रिया विधीत अश्रू पुसण्यासाठी धावले 'माकड'! लॉकडाउनमधील दोन घासांची ठेवली कृतज्ञता

१७ जणांना अटक 

सेलिब्रेशन प्रकरणी दाखल गुन्ह्यातील संशयित प्रशांत अशोक बागुल, विलास सोमनाथ बागुल (बागुलनगर, विहीतगाव), आतिश कैलास निकम, नितीन निवृत्ती बनकर (रोकडोबावाडी), आकाश नामदेव खताळे, अमोल अंबादास पठाडे, गोविंद शंकर इंगोले, विक्रम प्रकाश गवळी, तुषार जालिंदर भुजबळ, प्रशांत सिद्धार्थ रणशूर, नदीम सलिम बेग, अशोक हिरामण बागुल, अवेज जाकीर सय्यद, प्रतिक बाळू बागुल, निखिल रामनाथ नवले, शुभम राजाराम गांगुर्डे, सागर दिपक जाधव,  श्रीकांत अशोक बकाल, सुदर्शन कैलास आढाव, (विहीतगाव), विशाल चंद्रकांत पगारे (चेहडी), प्रशांत नाना जाधव (नाशिकरोड), अमोल शशिकांत जाधव, कुणाल दिलीप बर्वे (अनुसयानगर, टाकळी रोड), सुमित सुधीर तपासे (वडाळागाव), फरहान अन्वर सय्यद (गोसावीवाडी), सागर कोकणे (चेहडी पंपिंग), संदीप उर्फ हुसळ्या नरसिंग शिंदे (अरिंगळे मळा) आदींवर प्रतिबंधात्मक कारवाई केली.