जेव्हा कृषिमंत्री वाढदिवशी शेतकऱ्यांच्या झोपडीत जातात; पुढे कुटुंबाला काहीच सुचत नाही

मालेगाव (जि.नाशिक) : मंत्र्यांचा वाढदिवस असेल तर शहरात जागोजागी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. सत्कार समारंभात शुभेच्छांंचा वर्षाव करण्यात येतो. मात्र महाराष्ट्राचे कृषिमंत्री दादा भुसे यांचा वाढदिवस मात्र या या सगळ्याला अपवाद ठरला. कृषिमंत्र्यांनी  काल (ता.६) थेट आदिवासी शेतकऱ्याच्या बांधावर जात शेतशिवारात अनोख्या पध्दतीने वाढदिवस  साजरा केला.

 आभाळ ठेंगणे...!

दुपारी दीडच्या सुमारास भुसे यांनी सोमनाथ चौरे यांच्या घरी जेवण केले. नागलीची भाकरी आणि दोन-तीन प्रकारच्या रानभाज्या, मिरचीचा ठेचा इत्यादी पदार्थ त्यानी आवडीने खाल्ले. त्यानंतर आदिवासी बांधवांशी संवाद साधत ते एका झोपडीत गेले. कृषिमंत्री झोपडीत आले आणि जमीनीवर बसले. कुटुंबीयाना काय करावे सुचेना.

शेतकऱ्यांना कृषी अवजारे वाटप कार्यक्रमासाठी कृषिमंत्री दादा भुसे बारीपाडा येथे गेले होते. तेथे त्यांनी आदिवासी शेतकऱ्यांशी संवाद साधला. दरम्यान कृषिमंत्र्याचा वाढदिवस असल्याचे समजताच या भागातील महिलांनी आदिवासी बोलीभाषेतील गाणी म्हणत त्यांचे औक्षण केले. शेतीकामांची विचारपूस झाल्यानंतर त्यांनी भाजलेले हरभरे मंत्र्यांना खाण्यास दिले. सोबतच खिचडी खाण्याचा आग्रह केला, तेथेही भुसे यांनी खिचडीची चव चाखली.  कृषिमंत्री वाढदिवशी त्यांच्या झोपडीत येऊन जेवतात या प्रसंगाने बारीपाडा (धुळे) येथील आदिवासी बांधवांना आभाळ ठेंगणे झाले.

VIDEO : "मास्क काढ तो" राज ठाकरेंचा माजी महापौरांना इशारा; विनामास्क नाशिकमध्ये दाखल

आदिवासी बांधवांच्या घरातील रानभाज्या व खिचडचा गोडवा शब्दात वर्णन करता येणार नाही. आयुष्यातील वाढदिवशी मिळालेला हा अमुल्य ठेवा आहे. या जेवणातील गोडवा व औक्षण करताना आदिवासी माता भगिनींनी गायलेले गीत नेहमीच स्मरणात राहील. हार-तुऱ्यांपेक्षा हा सन्मान खूपच मोठा आहे. आदिवासी बांधवांच्या कष्टाला न्याय आणि सन्मान मिनवून दिला जाईल.

- दादा भुसे , कृषिमंत्री

हेही वाचा - तरुणाच्या आत्महत्येसाठी पुन्हा पोलीसच जबाबदार? चिठ्ठीत धक्कादायक खुलासा