जेव्हा बेपत्ता वडिलांची सापडली थेट डेड बॉडीच; मुलांच्या आक्रोशाने अख्खे गाव हळहळले

देवळा (नाशिक) : कुणालाही काहीही न सांगता ते घरातून निघून गेले होते. घरच्यांनी दिवसरात्र शोधा शोध केली. नातेवाईकांना फोन केले. आशा होती कुठून तरी घरी परततील. कामासाठी गेलो होतो म्हणून बोलतील. पण तीन दिवसाच्या प्रतीक्षेने सुद्धा असं घडलंच नाही. अन् जे घडलं होते ते समजताच कुटुबांने एकच हंबरडा फोडला...वाचा नेमके काय घडले?

अशी आहे घटना

सोमवारी (ता. १८) दौलत दत्तू आहेर (वय ४९, रा. हंडवा मळा, देवळा) सायंकाळपासून घरातून निघून गेले होते. आहेर यांनी स्वतःच्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. शुक्रवारी (ता. २२) सकाळी त्यांचा मृतदेह विहिरीत आढळल्याने एकच खळबळ उडाली. त्यांच्या नातेवाइकांनी त्यांचा शोध सुरू केला होता. शुक्रवारी आहेर यांचा मृतदेह त्यांच्या घराजवळच्या विहिरीत पाण्यावर तरंगताना आढळला. मृत्यूचे नेमके कारण समजले नाही. त्यांच्या मागे आई, पत्नी, दोन मुलगे, मुलगी असा परिवार आहे. 

हेही वाचा >  ‘कोब्रा-घोणस’च्या लढाईचा थरार! मांजराने केली मध्यस्थी; पाहा VIDEO

देवळा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याबाबत देवळा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. याप्रकरणी पोलिस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार गवळी, गायकवाड तपास करीत आहेत.  

हेही वाचा > ''माझ्या बायकोला आधी वाचवा हो'', रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नवऱ्याचा आक्रोश; दुर्देवी घटना