जेव्हा १३० रुपये किलोची द्राक्षे विकावी लागली दहा रुपयांना! द्राक्ष बागायतदारांसमोर अनेक प्रश्न

१३० रुपये किलोची द्राक्षे दहा रुपयांना विकायची वेळ 

कसबे सुकेणे (जि.नाशिक) : सध्या परिसरात अनेक द्राक्षबागा विक्रीयोग्य स्थितीत आल्या असतानाच निसर्गाचा लहरीपणा व बिगरमोसमी पाऊस यामुळे निर्यातक्षम द्राक्षबागा सरासरी १३० रुपये किलोने विक्रीसाठी तयार होत्या. त्यात द्राक्षबागा वायनरी उद्योगासाठी केवळ दहा रुपये किलोने विक्रीसाठी द्याव्या लागणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे.

शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका

बिगरमोसमी पाऊस, सतत ढगाळ वातावरण, आठ दिवसांपासून दाट धुके व पहाटेची थंडी या सर्व गोष्टींमुळे कसबे सुकेणे परिसरातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला असून, लाखो रुपयांची हानी झाली आहे. परिसरात शरद सीडलेस, फ्लेम, पर्पल, मामा जम्बो व जम्बो आदी काळी प्रकाराची द्राक्ष मोठ्या प्रमाणात असून, त्यांना सुरवातीलाच बाजारभाव चांगला असतो. त्यामुळे येथील अनेक शेतकरी लवकर काळ्या द्राक्षबागा छाटतात.

हेही वाचा >> मनाला चटका लावणारी बातमी! माऊलीच्या नशिबी दोनदा दफनविधी अंत्यसंस्काराचा योग; जुळली मुलांशी झालेली ताटातूट

या द्राक्षबागा डिसेंबर व जानेवारीत काढणीसाठी येतात. सध्या परिसरात अनेक द्राक्षबागा विक्रीयोग्य स्थितीत आल्या असतानाच निसर्गाचा लहरीपणा व बिगरमोसमी पाऊस यामुळे निर्यातक्षम द्राक्षबागा सरासरी १३० रुपये किलोने विक्रीसाठी तयार होत्या. त्या द्राक्षबागांच्या द्राक्षमण्यांना तडे गेल्यानंतर त्यात द्राक्षबागा वायनरी उद्योगासाठी केवळ दहा रुपये किलोने विक्रीसाठी द्याव्या लागणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे.

हेही वाचा >> बळीराजाच्या नशिबी दुर्दैवच; जेव्हा स्वत:च्याच डोळ्यादेखत संसाराची राखरांगोळी होते तेव्हा..

द्राक्ष बागायतदारांसमोर प्रश्न उभा

कसबे सुकेणे व मौजे सुकेणे येथील जवळपास दहा ते पंधरा शेतकऱ्यांना हा आर्थिक फटका बसला असून, लाखो रुपयांचा माल कवडीमोल विकण्याची वेळ आली आहे. शासनाच्या प्रतिनिधींनी पंचनामे केले असले तरी शासकीय मदत किती मिळणार, हाच खरा प्रश्न द्राक्ष बागायतदारांसमोर उभा आहे. 
 

 

माझ्या एकट्याचेच पर्पल या द्राक्षबागेचे एक हेक्टर क्षेत्रावरील एकशे दहा क्विंटल द्राक्ष मालाला तडे गेले असून, हा द्राक्षबाग १३० रुपयाने एक्स्पोर्ट विक्रीसाठी तयार झाला होता. मात्र आता तोच द्राक्षमाल केवळ दहा रुपये किलोने विकण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सरासरी १२ ते १३ लाखांचे आर्थिक नुकसान झाले आहे. - सुरेश दयाळ, निर्यातक्षम द्राक्ष बागायतदार, कसबे सुकेणे 

हेही वाचा >> मनाला चटका लावणारी बातमी! माऊलीच्या नशिबी दोनदा दफनविधी अंत्यसंस्काराचा योग; जुळली मुलांशी झालेली ताटातूट

कसबे सुकेणे व परिसरात अनेक द्राक्षबागा लवकर छाटल्या जातात. मात्र बदलत्या हवामानामुळे या द्राक्षबागांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. शेतकऱ्यांनी पाणी व औषधांचे योग्य नियोजन करावे, शासनानेही शेतकऱ्यांना पंचनामानिहाय आर्थिक मदत करणे आवश्यक आहे. - वासुदेव काठे, द्राक्षतज्ज्ञ व दाभोळकर प्रयोग समन्वयक.  

हेही वाचा >> बळीराजाच्या नशिबी दुर्दैवच; जेव्हा स्वत:च्याच डोळ्यादेखत संसाराची राखरांगोळी होते तेव्हा..