जेव्हा ७ फुटी कंपाउंडवरून उडी मारत बिबट्या करतो हल्ला; घटनेने परिसर हादरला

सिन्नर (नाशिक) : सिन्नरच्या पूर्व भागात मिरगाव-शहा शिवारातील घटना. जेव्हा 7 फूट उंचीचे तारेचे कंपाउंडवरून उडी मारुन बिबट्या आपला डाव साधतो. अन् काम फत्ते करुन त्याने आल्या पावली काढला पळ. घटना सीसीटीव्हीत कैद झाल्याने सविस्तर प्रकार उघड. वाचा नेमके काय घडले?

अशी आहे घटना

शनिवारी (ता.9) मध्यरात्रीची घटना...शहा - मिरगाव रस्त्यालगत प्रभाकर काशिनाथ घोडेराव यांची वस्ती आहे. गेल्या दिवसांपासून बिबट्यांची जोडी इकडे ठाण मांडून आहे. घोडेराव कुटुंब गाढ झोपेत असतांना घडला प्रकार. घराला संरक्षणासाठी 7 फूट उंचीचे तारेचे कंपाउंड असून हे कंपाउंड ओलांडत बिबट्याने आपला डाव साधला. परिसरात बिबट्या असल्याने घोडेराव कुटुंबीयांनी घराजवळ आपला जर्मन शेफर्ड कुत्रा बांधून ठेवला होता. बिबट्याने शिकारीवर ताव मारून आल्या पावली पळ काढला. सकाळी उठल्यावर घोडेराव कुटुंबियांच्या हा प्रकार लक्षात आला. मात्र घडलेली घटना सीसीटीव्हीत कैद झाल्याने घोडेराव कुटुंबाला प्रकार समजला. 

हेही वाचा > रुग्णवाहिकाचालकाने अ‍ॅम्ब्युलन्समध्येच साधली संधी; अपघातग्रस्त रुग्णासोबतच धक्कादायक प्रकार

...तर वनकर्मचाऱ्यांनी करायचे काय? असा प्रश्न

बुधवारी बिबट्याने दोन वस्त्यांवर दर्शन दिल्यावर गुरुवारी वनविभागाकडून पाहणी करण्यात आली. जवळच्या शिंदेवाडी परिसरात लावलेला पिंजरा शुक्रवारी सकाळी मिरगावला आणण्यात आला. या पिंजऱ्यात ठेवण्यासाठी रात्रभर कोणी शेतकरी शेळी देईना. त्यामुळे कोंबड्या विकत घेऊन त्या पिंजऱ्यात ठेवण्यात आल्या. शुक्रवारी रात्री 8 वाजेच्या दरम्यान हिंगे व बैरागी वस्तीवर बिबट्यांची जोडी पुन्हा आढळून आली होती. त्याअगोदर शहा शिवारात ही जोडी रस्ता ओलांडताना शेतकऱ्यांनी पहिली होती.  बिबट्याचा बंदोबस्त करा असे संगणारे शेतकरी पिंजऱ्यात ठेण्यासाठी सहकार्य म्हणून शेळी देत नसतील तर वनकर्मचाऱ्यांनी करायचे काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

हेही वाचा > चोरट्यासोबत जेव्हा 'ती' महिलाही चालत्या रेल्वेतून पडली खाली; घटनेने प्रवाशांचा थरकाप