लासलगाव (जि. नााशिक) वार्ताहर
जैन समाजाचे तपस्वी गुरूदेव आचार्य श्री कामकुमार नंदीजी महाराज यांच्या कर्नाकटातील आश्रमात घुसून समाजकंटकांनी त्यांची हत्या केल्याप्रकरणी लासलगाव येथील जैन समाजबांधवांनी गुरुवारी (दि.२०) या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून दोषींवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
सकाळी येथील जैन उपाश्रय पासून लासलगाव पोलीस ठाण्यापर्यंत मूक मोर्चा काढून याबाबतचे निवेदन लासलगाव पोलीस ठाण्याचे सहा पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना देण्यात आले. कर्नाटकातील चिकोडी येथे जैन समाजाचे कामकुमार नंदीजी महाराजांची निर्दयपणे हत्या करण्यात आल्यानंतर देशभरात जैन बांधवांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्या पार्श्वभूमीवर लासलगाव येथे सकल जैन समाजाच्या वतीने या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला. यावेळी नागरिकांनी बारा वाजे पर्यंत आपली आस्थापने बंद ठेवत या घटनेचा निषेध केला.
यावेळी संघपती नितिन जैन, महावीर दगडे, चंदनमल धाडीवाल, आनंद आब्बड, लासलगाव ग्रामपंचायत सरपंच जयदत्त होळकर, नाशिक मर्चंट बँकेचे संचालक प्रकाश दायमा, संतोष पलोड, अशोक होळकर ,शिवा सुरासे, राजेंद्र चाफेकर, शंतनू पाटील, प्रकाश पाटील, अमोल थोरे, सचिन होळकर, गणेश जोशी, संतोष पानगव्हाणे , भाऊसाहेब देवकाते सकल जैन समाज यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होता.
भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासोबतच या घटनेतील दोषीस कठोर शासन झाले पाहिजे अशी मागणी लासलगाव येथील जैन समाज बांधवांनी केली.
हेही वाचा :
- Goa : धारबोंदाडा येथे १२० जिलेटीनच्या कांड्या, सुमारे ३०० डेटोनेटर्स जप्त
- यू-ट्यूबच्या मदतीने विद्यार्थी गिरवणार धडे !
- खडकीत टोळक्याने वाहने फोडली ; दहशत पसरविण्याचा प्रयत्न
The post जैन मुनींच्या हत्येच्या निषेधार्थ लासलगावी मूक मोर्चा appeared first on पुढारी.