ज्येष्ठ छायाचित्रकार राम पोतदार यांचे निधन; छायाचित्रण क्षेत्रातील एक समर्पित व्यक्तिमत्त्व हरपलं 

नाशिक : नाशिकमधील ज्येष्ठ छायाचित्रकार राम पोतदार यांचे दुःखद निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. नाशिकमधील अमरधाममध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वृत्तपत्र छायाचित्रणात आपला वेगळा ठसा राम पोतदार यांनी उमटवला आहे. वृत्तपत्र छायाचित्रकारांना मार्गदर्शन करणारे छायाचित्रणकलेमधील गुरूच्या निधनामुळे एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अशी प्रतिक्रिया अनेक छायाचित्रकारांनी दु:ख व्यक्त केले आहे. 

छायाचित्रण क्षेत्रातील ते एक समर्पित व्यक्तिमत्त्व 

नाशिकमध्ये छायाचित्रकार त्यांना गुरु मानत होते. वृत्तपत्र छायाचित्रणात आपला वेगळा ठसा राम पोतदार यांनी उमटवला होता. त्यांच्या निधनाने वृत्तपत्र छायचित्रकारांपासून ते हौशी छायाचित्रकारांना मार्गदर्शन करणारा एक व्रतस्थ छायचित्रकार हरपला आहे. अशी प्रतिक्रीया पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच

हेही वाचा - ही कसली स्टंटबाजी? पठ्ठ्याचे शेतात चक्क बिबट्यासोबत फोटोसेशन; VIDEO व्हायरल