ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक विठोबा पाटील मेढे यांचे निधन; नाशिक जिल्ह्यातील पश्चिम पट्याचा वाघ अखेर हरपला…

आंबोली (जि.नाशिक) : नाशिक जिल्ह्यातील पश्चिम पट्याचा वाघ अखेर हरपला. दिनांक 10 जुलै 1913 ते 02 फेब्रुवारी 2021 या एका शतकाचे साक्षीदार अंबोली (ता. त्र्यंबकेश्वर जि.नाशिक) येथील स्वातंत्र्यसैनिक, जेष्ठ समाजवादी नेते विठोबा पाटील तथा विठोबा भाऊ पाटील मेढे यांचे वयाच्या 109 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. सह्याद्रीच्या कुशीत स्वकर्तृत्वावर व ध्येयाने समाजात एका कुशलतेची छाप पाडणाऱ्या या अवलियाने वयाच्या 109 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

भाऊपाटील.. फर्डे वक्तृत्व..  बंडखोर वृत्ती अन्याय विरूद्ध यशस्वी लढणारं नेतृत्व

कै.काकासाहेब वाघ यांचे सहकारी तर कै.विनायक दादा पाटलांचे ते जिवलग होते. आपल्या तत्वावर ठाम राहून आपलं म्हणणं समोरच्याला पटेल असं मुद्देसूद मांडणी करून अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी जीवाचे रान करणारे भाऊपाटील.. फर्डे वक्तृत्व.. बंडखोर वृत्ती अन्याय विरूद्ध यशस्वी लढणारं नेतृत्व...नाशिक जिल्हा लोकल बोर्डात पाटील दोन वेळा निवडून आले होते..आंबोली गावच्या ग्रामपंचायतचे पहिले सरपंच ते अनेक वर्षे सरपंच होते..आंबोली विकास सहकार सोसायटीचे संस्थापक चेअरमन असून आंबोली धरण, अंबोली प्राथमिक आरोग्य केंद्र, जव्हार डहाणू रस्ता अंबोली गावावरून करून घेण्यासाठी त्यांनीच प्रयत्न केले होते..

हेही वाचा - ही कसली स्टंटबाजी? पठ्ठ्याचे शेतात चक्क बिबट्यासोबत फोटोसेशन; VIDEO व्हायरल

पाटलांच्या नेतृत्वाखालील अख्खा नाशिक तालुका लढ्यात सामील झाला. 

वयाची शंभरी गाठण्यासाठी नशीब लागतं त्याचप्रमाणे भाऊपाटील हे १०८ व्या वयापर्यंत नाबाद राहात निरोगी आयुष्य जगले. ते सहा भावंडांमध्ये सर्वात मोठे. प्रतिकूल स्थितीत दररोज ७ कि.मी पर्यंत पायी चालत शिक्षण घेतले. पुढे समाजकारण करत इगतपुरी येथील भाताच्या लेव्ही दरासाठी झालेल्या नाशिक मधील लढ्यात भाऊ पाटलांचे नेतृत्व दीर्घस्थानी होते. त्यावेळी सरकार भात खरेदीची सक्ती करत असताना महाराष्ट्रातील शेतकऱ्याला गुजरात पेक्षा कमी दर त्यामुळे शेतकरीवर अन्याय होत असल्याने शेतकरी एकत्र आले. काकासाहेब वाघ, पुंजाबाबा गोवर्धने, बाबुराव गोवर्धने , यासह भात पिकविणारे शेतकरी आणि विठोबा पाटलांच्या नेतृत्वाखालील अख्खा नाशिक तालुका लढ्यात सामील झाला. त्यावेळेस सरकारला भात मिळणे मुश्कील झाले. भाऊंना नाशिक जिल्ह्यातुन हद्दपार करण्यात आले. त्यांच्या पत्नी वेणुताईंना तुरूंगात टाकण्यात आले. भाऊंच्या समपर्णात गावोगावच्या पाटलांनी राजीनामे देत असहकार नोंदवला. त्यानंतर सरकार नरमले व भाताला योग्य भाव दिला. 

हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच