झंडुगाेळी खाऊन राऊतांचा मोर्चा : प्रवीण तिदमे

प्रवीण तिदमे, संजय राऊतwww.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; ड्रग्ज माफियांसोबत उबाठा गटाच्या नेत्यांचे संबंध सर्वश्रुत आहेत. त्यांचे एकत्र छायाचित्र सर्वत्र व्हायरल झालेले आहेत. पोलिस तपासामध्ये उबाठा गटाच्या तथाकथित नेतेमंडळींची चौकशी होऊ नये म्हणून पोलिसांवर दबाव आणण्यासाठी झंडुगोळी घेणाऱ्या खासदार संजय राऊत यांनी मोर्चा काढला, असा पलटवार शिवसेना शिंदे गटाचे महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांनी केला.

मोर्चामध्ये आणलेल्या महिलांना मोर्चा कशाबद्दल आहे हे पण माहीत नसल्याचे व्हिडिओ प्रसिद्ध झाले आहेत. मोर्चात ‘प्रीपेड कार्डस’ अधिक होते. माफियाकडून उबाठा नेत्यांना मिळालेले ‘खोके’ संजय राऊत यांना मिळाले नसल्याने संतप्त होत ‘खोके खोके’ ओरडत त्यांनी नाशिकला धाव घेतली आणि भाडोत्री मोर्चा काढला. उबाठा गटाचे माफिया कनेक्शन उघड होऊ नये आणि माफियाचे ‘खोके’ मिळावे यासाठीच ‘झंडुगोळी’ खाऊन राऊत यांचा हा आकांडतांडव सुरू असल्याची टीकाही तिदमे यांनी केली.

हेही वाचा :

The post झंडुगाेळी खाऊन राऊतांचा मोर्चा : प्रवीण तिदमे appeared first on पुढारी.