नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा; सावधान… येथे झाड आहे, प्रशासन झोपलेले आहे, आपला जीव वाचवा, येथे ‘रिफ्लेक्टर’ नाही… अशा आशयाचे फलक झाडावर लावत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे महापालिका प्रशासनाचा निषेध करण्यात आला.
त्याचप्रमाणे महापालिकेने लवकरात लवकर धोका दर्शवणारे ‘रिफ्लेक्टर’ झाडांवर लावावे अन्यथा प्रतीकात्मक ‘रिफ्लेक्टर’ लावून आंदोलन करण्याचा इशारादेखील देण्यात आला. मनसेतर्फे नाशिकरोड ते द्वारकाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या मधोमध अंधशाळा बसस्टॉप, म्हसोबा मंदिर, उपनगर नाका, पौर्णिमा बसस्टॉप इत्यादी ठिकाणी असलेल्या झाडावर धोका दर्शवणारे ‘रिफ्लेक्टर’ नसल्यामुळे झाडाला प्रतीकात्मक ‘रिफ्लेक्टर’ व निषेध फलक लावून मनपा प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी मनसेचे शहर संघटक अॅड. नितीन पंडित, मनविसे जिल्हा उपाध्यक्ष नितीन धानापुने, वाहतूक सेनेचे मयूर कुकडे, महिला शहराध्यक्ष भानुमती अहिरे, महिला विभाग अध्यक्ष मीरा आवारे, रंजन पगारे, राकेश परदेशी, अमित सालींस, शुभम गायकवाड, कृष्णा महाले आदी उपस्थित होते.
येथे आहे समस्या
दत्तमंदिर थांबा, अंधशाळा थांबा, सेंट झेवियर स्कूलसमोर, उपनगर नाका, बिरला हॉस्पिटल, पौर्णिमा बसस्टॉप, बोधलेनगर ते सातपूर पर्यंत रस्त्यांच्या दोन्ही बाजूला रस्त्यांवर झाडे आहेत व त्यावरचे धोका दर्शवणारे ‘रिफ्लेक्टर’ हे धुळीमुळे दिसेनासे झाले आहेत. बऱ्याच ठिकाणी रिफ्लेक्टर खराब झाले आहेत व रिफ्लेक्टर नाहीच. मनपा प्रशासनाने व आरटीओ पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने कालांतराने हे रिफ्लेक्टर बदलणे गरजेचे आहे व त्याची देखरेख करणे व रिफ्लेक्टरची साफसफाई करणे गरजेचे आहे परंतु प्रशासन झोपलेले आहे.
हेही वाचा :
- लूटमार करणार्या खासगी बसचालकांना दणका ; 8 लाखांचा दंड वसूल
- History Hunter : सरस्वती नदी ही केवळ दंतकथा आहे का वस्तुस्थिती, उलगडणार कोडे
- Pollution : पुणं रात्रीचे 4 तासच असतंय शुद्ध
The post झाडाला "रिफ्लेक्टर' लावून मनसेकडून महापालिकेचा निषेध appeared first on पुढारी.