झोपतच महिलेचे चोरले दागिने ; ४१ हजाराचे दागिने लंपास

नाशिक रोड : झोपलेल्या ज्येष्ठ महिलेच्या (वय.७१) गळ्यातील ४१ हजार किमतीचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून चोरट्याने लांबवले. जयभवानीरोड या ठिकाणी महिला एकटी झोपलेली असताना ही घटना घडली. 

झोपतच महिलेचे चोरले दागिने

बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास शेजवळ या औषध घेऊन झोपलेल्या होत्या. यावेळी चोरट्याने घरात घुसून त्यांच्या गळ्यातील दीड तोळ्याची चाळीस हजाराची सोन्याची पोत व हातातील सोन्याचे पालिश केलेल्या दोन पाटल्या 
असे 41 हजाराचे दागिने चोरून नेले. त्यांची मुलगी वैशाली धिवरे यांच्या तक्रारीवरुन उपनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हेही वाचा > मामाने वाचवले पण नियतीने हिरावले! चिमुकल्या जयाची मृत्युशी झुंज अपयशी

हेही वाचा > मोकाट कुत्र्याच्या तावडीत इवलेसे बिथरलेले पाडस; युवकांनी दिले जीवदान