”टाळी एका हाताने वाजत नाही!” छगन भुजबळांचे राज्यपालांवर टिकास्त्र

नाशिक : टाळी एका हाताने वाजत नाही, अशा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका केली. राज्यपाल आणि सरकार यांच्यात विमानवारीवरून निर्माण झालेल्या संघर्षावर बोलताना भुजबळ म्हणाले की, राज्यपाल आणि सीएमओ यांनी एकमेकांचा मान-सन्मान राखायला हवा. मंत्रिमंडळाने जसा राज्यपालांचा मान ठेवायला हवा, तसाच राज्यपालांनीही मंत्रिमंडळाच्या निर्णयाचा सन्मान करून  कार्यवाही करणे आवश्यक आहे. प्रत्यत्रात मात्र तसे होत  नाही. राज्यपालांची भूमिका लोकशाहीला घातक आहे.

 

हेही वाचा - लग्नाच्या दोनच दिवसांत नवरी पसार! पुण्यातील नवरदेवाची लाखोंची फसवणूक

 

हेही वाचा - ऑनलाइन गेम ठरतायत विद्यार्थ्यांच्या भविष्याला घातक! मानसिक गुंता सोडविण्यासाठी तज्ज्ञांकडे गर्दी