टेस्लाची एंट्री अन् अभियंत्यांना फुल टू स्कोप! केमिकल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल शाखांना वाव 

अभियंत्यांना फुल टू स्कोप 

टेस्लाची भारतात एंट्री; केमिकल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल शाखांना वाव 

नाशिक : जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलोन मस्क यांनी १३ जानेवारीला अखेर टेस्ला कार भारतात निर्माण करण्याचा निर्णय घेतला. या अमेरिकन इलेक्ट्रिक वाहन कंपनीने बेंगळुरूमध्ये नवीन कार्यालयाची नोंदणी केली. कंपनीने पहिले ऑफिस बेंगळुरू क्लबच्या समोर रिचमंड सर्कल जंक्शन या ठिकाणी उघडले आहे. कंपनीचे रजिस्ट्रेशन हे टेस्ला इंडिया मोटर्स ॲन्ड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या नावाने करण्यात आले आहे. डेव्हिड जॉन फेनस्टाइन, वैभव तनेजा आणि व्यंकटरंगम श्रीराम यांना सहाय्यक संचालक म्हणून नेमले आहे. 

भारतात टेस्लाची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी ऑक्टोबरमध्ये एक ट्विट केले होते. त्यात म्हटले होते, की २०२१ मध्ये कंपनी भारतीय बाजारात एन्ट्री करणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले होते, की कंपनी पुढील वर्षीपासून भारतात आपले कामकाज सुरू करणार आहे. भारत पुढील पाच वर्षांत जगातील सर्वांत मोठा इलेक्ट्रिक उत्पादन देश म्हणून समोर येईल. याचा सर्वांत जास्त फायदा अभियंत्यांना असणार आहे. इलेक्ट्रिक व्हेइकल इंडस्ट्री ही मल्टी-डिसपिलनारी फील्ड आहे. यात वेगवेगळ्या प्रकारचे इंजिनिअर्स सहभागी असतात. केमिकल इंजिनिअर्स हे बॅटरीसाठी काम करू शकतात, इलेक्ट्रिकल इंजिनिअर्स हे मोटर, वायर हर्नेसिंगसाठी काम करू शकतात. मेकॅनिकल इंजिनिअर्स हे थर्मल सिस्टिम, व्हेइकल पार्ट डिझाइनसाठी काम करू शकतात, तर मेकाट्रोनिक इंजिनिअर्स रोबोटिक्स, पॉवर ट्रेन कंपोनंट्स डेव्हलपमेंटसाठी काम करू शकतात. 
इलेक्ट्रिक कार डिझाइन, डेव्हलपमेंट आणि टेस्टिंग या फील्डमध्ये इंजिनिअर्सला स्कोप असणार आहे. त्यासाठी वेगवेगळ्या विद्यापीठात ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेस डिझाइन करण्यात आले आहेत. एवढेच नाही तर ऑनलाइन कोर्सेस पण उपलब्ध करण्यात आले आहेत. जसे की इंट्रोडक्शन टू इलेक्ट्रिक व्हेइकल बाय एनपीटीएल, इंट्रोडक्शन टू बॅटरी मॅनेजमेंट सिस्टिम बाय कोरसेरा, इंट्रोडक्शन टू इलेक्ट्रिक व्हेइकल बाय. 

हेही वाचा > ऐनसंक्रांतीच्या सणाला घरावर ओढावली 'संक्रांत'; लेकाला उराशी धरुन मातेचा जीवघेणा आक्रोश

टेस्ला भारतात येण्याने खूप मोठ्या प्रमाणात नोकरीची संधी उपलब्ध होईल आणि इंजिनिअर्सच्या करिअरला नक्कीच चालना मिळेल. -इंजि. हनुमंत चव्हाण, इलेक्ट्रिकल इंजिनिअर 

हेही वाचा > ढोंगीबाबाचा कारनामा! आधी खड्याचा केला रुद्राक्ष अन् नंतर केले असे काही; रवानगी थेट पोलिस ठाण्यातच 

एकविसावे शतक आधुनिकीकरण व तंत्रज्ञानाचे युग आहे. भारताने सौरऊर्जा तंत्रज्ञान विकसित करत जागतिक स्तरावर एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. टेस्ला भारतात येण्याने औद्योगिक क्षेत्राला गती मिळेल आणि इंजिनिअर्सच्या करिअरला बूस्ट. -प्रा. डॉ. दीपक कदम, विद्युत विभागप्रमुख, मेट भुजबळ नॉलेज सिटी, नाशिक