
जळगाव: पुढारी वृत्तसेवा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जळगावातील शिवसेनेच्या सर्वच आमदारांनी पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ केला. त्यामुळे शिवसेनेतील सर्वच राजकारण बदलून गेले आहे. आजवर ठाकरे कुटुंबाशी एकनिष्ठ असलेले नेतेही पक्ष सोडून जात आहे. हेच नेते आता ठाकरे पितापुत्रावर टीकेचे बाण सोडत आहेत. जळगावचे माजी पालकमंत्री आमदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) हे देखील शिवसेनेशी एकनिष्ठ असल्याचे मानले जात होते. मात्र, त्यांनीही ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात सामील झाले. आता त्यांनी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
जळगावात अजिंठा विश्रामगृहात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) बोलत होते. ते म्हणाले, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना शिवसेनेच्या शाखांवर फिरावे लागत आहे. यासारखे दुसरे दुर्दैव नाही. उद्धव ठाकरे तसेच आदित्य ठाकरे यांनी आधीच हे दौरे केले असते तर कदाचित ही वेळ आली नसती; असा टोला मंत्री गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शिवसेनेच्या शाखांवर फिरावं लागत आहे, यासारखं दुसरे दुर्दैव आज नाही. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी आधीच हे दौरे केले असते तर कदाचित ही वेळ आली नसती,’ असा टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे.
Gulabrao Patil : आम्हीच खरे शिवसैनिक
मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे हे आजारी होते. मात्र आदित्य ठाकरे हे तर तरुण होते. त्यांनी तरी राज्याचे दौरे करायला हवे होते. मात्र आता सत्ता गेल्यानंतर ते संपूर्ण राज्यात शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून फिरत आहेत. आदित्य यांनी आधीच सर्व जिल्ह्यांचे दौरे केले असते तर कदाचित आज ही वेळ आली नसती,’ असं गुलाबराव पाटील म्हणाले. दरम्यान, ठाकरे पितापुत्रावर निशाणा साधत असताना गुलाबराव पाटील यांनी खरे शिवसैनिक आम्हीच आहोत, या दाव्याचाही पुनरुचार केला आहे.
सायलीच्या ‘गोष्ट एका पैठणीची’ चित्रपटाच्या शूटींगचे अनोखे किस्से! #SayaliSanjeev @Filmcity_ @NATFilmAwards #pudharionline #pudharinews #film #marathi_Film #awards2022 #Awardshttps://t.co/HN9JDAfgDBसायलीच्या-गोष्ट-एका-पैठणीची-चित्रपटाच्या-शूटींगचे-अनोखे-किस्से/ar
— Pudhari (@pudharionline) July 22, 2022
हेही वाचलंत का ?
- Ajay Devgan : तिन्ही खानांना टक्कर देत अजय देवगण याने तिसऱ्यांदा पटकावले राष्ट्रीय पुरस्कार
- भंडारा : बर्थ डे पार्टीला पैसे न दिल्याने विद्यार्थीनीची आत्महत्या
- Chandrayan 2 Launching Day : चांद्रयान 2 चा आज ‘लाँचिंग डे’ त्यानिमित्त या मोहिमेतील काही महत्वाची क्षणचित्रे
The post ठाकरे पितापुत्रावर गुलाबरावांची तोफ धडाडली; आधीच दौरे केले असते तर... appeared first on पुढारी.