ठाण्याचा ‘डॉन’ जळगाव एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात

ठाण्याचा ‘डॉन’ जळगाव पोलिसांच्या जाळ्यात

जळगांव ; पुढारी वृत्‍तसेवा ठाणे आणि उल्हासनगर परिसरात वेगवेगळ्या १६ गुन्ह्यात फरार असलेला प्रथमेश उर्फ डॉन प्रकाश ठमके याला पोलिसांनी अटक केली. सिंधी कॉलनी येथील वर्सी महोत्सवात तो येणार असल्‍यची माहिती पोलिसांना मिळाली. त्‍यावरून जळगाव एमआयडीसी पोलिसांनी त्‍या ठिकाणी त्याच्या मुसक्या आवळल्या.

ठाणे शहर पोलीस ठाण्यातील विविध गुन्ह्यातील फरार संशयीत आरोपी प्रथमेश उर्फ डॉन प्रकाश ठमके रा.उल्हासनगर, जि.ठाणे हा जळगावात सिंधी कॉलनी येथील वर्सी महोत्सवात आला असल्याची माहिती गुप्त एमआयडीसी पोलिसांना मिळली होती. या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, महिला पोलीस उप निरीक्षक रुपाली महाजन, सहाय्यक फौजदार दिनेश बडगुजर, कर्मचारी अमित मराठे व जुबेर तडवी यांनी वर्षी महोत्सव सिंधी कॉलनी प्रथमेश उर्फ डॉन प्रकाश ठमके रा.उल्हासनगर, याला पकडण्यासाठी त्या ठिकाणी सापळा लावला.

महोत्सवात कोणतीही गडबड किंवा गोंधळ होऊ नये याचीही खबरदारी घेण्यात आली. त्या ठिकाणी त्याच्या मुस्क्या आवळण्यात आल्या. पुढील कारवाईसाठी त्याला ठाणे क्राईम ब्रांच सहाय्यक निरीक्षक रुपाली पोळ यांच्या ताब्यात देण्यात आले. जळगाव पोलिसांच्या कामगिरीचे जनमानसात कौतुक होत आहे.

हेही वाचा :

The post ठाण्याचा ‘डॉन’ जळगाव एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात appeared first on पुढारी.