डान्सचालक, नृत्य प्रशिक्षक पुन्हा ट्रॅकवर; विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद

नाशिक : डान्सचालकांच्या माध्यमातून कलाकार निर्माण करण्याचे काम होते. मात्र, लॉकडाउन काळात ब्रेक लागला. आता क्लासेस सुरू झाल्याने डान्सचालकांना दिलासा मिळाला आहे. नाशिकमध्ये डान्सचालकांची संख्या जवळपास चारशेच्या घरात असून, यातून हजारो कलाकार निर्माण होत असतात. लॉकडाउन काळात सर्वच क्षेत्र पूर्णपणे ठप्प झाले होते. त्यात डान्सचालकांचे मोठे नुकसान झाले. काही चालकांनी ऑनलाइन क्लास घेतला, मात्र त्याला विद्यार्थ्यांचा मिळणारा प्रतिसाद अत्यल्प होता. आता अनलॉकनंतर परिस्थिती सामान्य होत असून, नाशिकमध्ये ३० टक्के क्लासेस सुरू झाले आहेत. विद्यार्थ्यांची संख्याही वाढताना दिसत आहे. त्यामुळे डान्स क्लासचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

परिस्थिती सामान्य, विद्यार्थ्यांची संख्या वाढली 

नाशिकमधील डान्सचालक लॉकडाउनमध्ये नोकरी करत होते. मात्र, परिस्थिती सुरळीत झाल्यानंतर डान्सचालक नोकरी सोडून पुन्हा क्लासेस घेत आहेत. शाळेतील शिकविणारे नृत्य प्रशिक्षक ऑनलाइन विद्यार्थ्यांना शिकवीत आहेत. काही कार्यक्रम होत असल्याने विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. ऑनलाइन क्लास घेताना अडचणी आल्या, मात्र अडचणींवर मात करत काही चालकांनी क्लास घेत विद्यार्थ्यांना डान्स शिकविले आहेत. परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी वेळ लागणार असला, तरी ३० टक्क्यांहून अधिक क्लासेसला सुरवात झाल्याने दिलासा मिळाला आहे. नाशिकमधील काही नृत्य प्रशिक्षकांनी व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

हेही वाचा > मध्यरात्री जेव्हा चोर लागतो नागरिकांच्या हाती; प्लॅन तर फसलाच अन् नंतर फक्त दे दणा दण

लोकांमध्ये अजूनही कोरोनाची भीती आहे. कार्यक्रम संपूर्ण बंद असून, क्लासेस ऑनलाइन मुलांना शिकविले जात आहे. नृत्य प्रशिक्षकाची संख्या नाशिकमध्ये खूप आहे. डान्स असोसिएशनने कोरोनाकाळात विविध डान्स चालकांना मदत केली आहे. कोरोनानंतर काहींनी वेगळा पर्याय निवडला आहे. - सागर कांबळे 

कोरोनाकाळात डान्स चालकांची परिस्थिती बिकट होती. कार्यक्रम होत नसल्याने अडचणी आल्या नाशिकमधील प्रशिक्षकांनी ऑनलाइन क्लास घेतले. अनलॉकनंतर परिस्थिती रूळावर येत आहे. डान्स क्लासेसला विद्यार्थ्यांचा प्रतिसादही वाढत आहे. - पंकज गांगुर्डे 

कोरोनानंतर डान्स चालक, नृत्य प्रशिक्षकांची स्थिती बदलली आहे. यात काही व्यक्तींचे संसार यावर अंवलबून असल्याने अडचणी आहे. लॉकडाउननंतर ज्यांनी दुसरा पर्याय निवडला आहे, त्यासाठी उपक्रम राबविले जात आहे. - सचिन खैरनार  

हेही वाचा > खासगी सावकारी वादातून अपहरणानंतर अमानुष कृत्य; नाशिकमधील धक्कादायक प्रकार