”डाव्या पुरोगामी चळवळीची कधीही भरून न निघणारी हानी”; छगन भुजबळांची कॉम्रेड देशपांडेंना श्रध्दांजली

नाशिक : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड श्रीधर देशपांडे यांचे आज (ता.३) सकाळी सात वाजता covid-19 याच्या संसर्गामुळे निधन झाले. ‌गेल्या एक आठवड्यापासून ते आजारी होते. सुरुवातीला किर्लोस्कर हॉस्पिटल व नंतर हॉस्पिटल मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनानंतर अन्न, नागरी पुरवठा तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी श्रध्दांजली देत दु;ख व्यक्त केले आहे.

छगन भुजबळ यांची कॉम्रेड श्रीधर देशपांडेना श्रध्दांजली

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड श्रीधर देशपांडे यांचे आज (ता.३) कोरोनाच्या संसर्गामुळे दुःखद निधन झाले.‌ सातत्याने शेतकरी कामगार यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी लढा देणारे कॉम्रेड श्रीधर देशपांडे डाव्या पुरोगामी चळवळीतील एक महत्वाचे नेते होते. विमा कर्मचाऱ्यांचे नेते म्हणून सुमारे पाच दशके भरीव कार्य केले.

हेही वाचा - दशक्रिया विधीत अश्रू पुसण्यासाठी धावले 'माकड'! लॉकडाउनमधील दोन घासांची ठेवली कृतज्ञता

डाव्या पुरोगामी चळवळीची कधीही भरून न निघणारी हानी

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या व सिटू संघटनेमध्ये त्यांनी नेतृत्वदायी भूमिका बजावली. जिल्ह्यातील बंद पडलेल्या बँका व पतसंस्थांच्या ठेवीदारांना न्याय मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. कॉम्रेड श्रीधर देशपांडे यांच्या निधनाने डाव्या पुरोगामी चळवळीची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे. मी व माझे कुटुंबीय देशपांडे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर मृत आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो.

हेही वाचा - आंदोलनास बसलेल्या कोरोनाबाधिताचा मृत्यू प्रकरण : दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची पत्नीची मागणी