डॉ.पी डी गांडाळ यांचे असंसर्गिक आजाराच्या अभ्यासक्रमात यश

नाशिक : सामाजिक आरोग्य आणि असंसर्गिक आजार या विषयावरील 6 व्या आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम पूर्ण करून नाशिक विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ.पी.डी.गांडाळ यांनी महाराष्ट्रातुन प्रतिनिधित्व करत यश संपादन केले आहे. वाचा सविस्तर >>

वर्षभरात अवघे ५० ते ६० अधिकारी उत्तिर्ण होतात. 

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या अभ्यासक्रमासाठी भारतातून आरोग्य विभागातून उपसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांना बसण्याची नामांकने  मागविण्यात आली होती. संपूर्ण देशात या अभ्यासक्रमात वर्षभरात अवघे ५० ते ६० अधिकारी उत्तिर्ण होत असतात.या अभ्यासक्रमासाठी  विविध देशातील आरोग्य विभागातील व वैद्यकीय महाविद्यालयातील प्रोफेसर यांनी सहभाग घेतला होता.

हेही वाचा - Success Story : दृष्टिबाधित ज्ञानेश्‍वरची भरारी! मेहनत, चिकाटी व स्वकष्टातून बनला बँक अधिकारी 

सर्व अभ्यास केला ऑनलाईन (Online) पद्धतीने 

आपल्या महाराष्ट्रातून डॉ.गांडाळ यांची निवड होऊन त्यांनी सदर ऑनलाईन अभ्यासक्रम कोरोना महामारीत व्यस्त असताना पण सहभाग घेत ऑनलाईन परीक्षा दिली . मागील मार्च महिन्यात दि २ते७ मार्च कालावधी मध्ये या अभ्यासक्रमासाठी डॉ पी डी गांडाळ यांची निवड झाली होती.त्या अभ्यासक्रम कालावधीत online झालेल्या सर्व परीक्षेत डॉ.गांडाळ हे उत्तिर्ण झाले आहेत.

कामाचा ताण आणि अभ्यास याचा साधला मेळ.

यातील विशेष बाब म्हणजे डॉ.गांडाळ यांनी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला तेव्हा देशात व महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट सुरू होऊन रुग्ण संख्येत वाढत होत होती. त्यानंतर अंशतः लॉकडाऊन लागून  mission begin again सुरू झाल्याने आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कामाचा कमालीचा अतिरिक्त ताण वाढला होता. रात्रंदिवस अतिशय़ व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून डॉ.गांडाळ यांनी हा अभ्यासक्रमाचा अभ्यास पण पूर्ण केला.

कधी कार्यालयात तर कधी प्रवासात केला अभ्यास. 

अतिशय कठीण कोरोना महामारीवर सामना करत नियमित कामाच्या व्यापातून वेळ देत त्यांनी या course दरम्यान च्या दैनंदिन exercise सोडावीत, दररोज आठ असेसमेंट अहवाल देत, दररोजचे प्री-टेस्ट,पोस्ट टेस्ट भरून ,दिवसभरातील झालेल्या  सत्रांचा feedback देत सहभाग नोंदवत त्या ऑनलाईन पाठऊन अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करीत ते उत्तिर्ण झाले.आरोग्य विभागाच्या नियमित व्हिडीओ कॉन्फरंसिंग सोबत त्यांनी कधी कार्यालयातील कॉम्प्युटर वर ऑनलाईन तर कधी कोरोना निमित्त क्षेत्र भेटीवर असताना प्रवासात  मोबाईल वर या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेतले. व त्यांना ऑनलाईन प्रशस्तीपत्रक  प्राप्त झाले.त्यांच्या या सुयशाबद्दल डॉ.गांडाळ यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हेही वाचा - क्रूर नियती! अखेरच्या क्षणी बापाला खांदा देणंही नाही नशिबी; कोरोनाबाधित मुलाचे व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे अंत्यदर्शन