डोक्यावरच्या कर्जाने घुसमटत होता जीव; शेतकऱ्याचा एक निर्णय अन् कुटुंब झाले पोरके

नामपूर (नाशिक) : निसर्गाची अवकृपा अन्‌ कोरोनाच्या संकटामुळे सरकारची अनिश्‍चित धोरणे अशा कात्रीत सापडलेल्या वयोवृद्ध शेतकऱ्यांच्या आत्महत्येने अख्खा नळकस परिसर सुन्न झाला. काही वेळ घरी न परतल्याने पत्नीला संशय येताच सुरु झाला शोध. अन् त्यातच कळाली ही बातमी. वाचा काय घडले?

अखेरचा निर्णय घेतला...

नळकस (ता. बागलाण) येथील वयोवृद्ध शेतकरी हिरामण महादू देवरे (वय ६२) यांची नळकस गावात सुमारे दोन एकर वडिलोपार्जित शेती आहे. यंदा महागडे कांदा बियाणे खरेदी करूनही रोगट हवामान, अतिवृष्टीमुळे कांद्याची रोपे पूर्णपणे वाया गेली. त्यापूर्वी खरिपातही बाजरी व मक्याचे पीक पूर्णत: वाया गेल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. त्यांच्यावर सहकारी सोसायटी, खासगी वित्तीय संस्था, हातउसनवार आणलेले असे एकूण जवळपास सात लाख रुपयांचे कर्ज आहे. बुधवारी (ता. २५) हिरामण देवरे हे खूप वेळ उलटूनही घरी न परतल्याने त्यांची पत्नी यशोदाबाई शेताकडे गेल्या. विहिरीच्या बाहेरच पतिच्या चप्पला आढळून आल्याने त्यांना जरा संशय आलाच. धावतच विहिरीकडे जात मध्ये डोकावून पाहिले असता त्यांना धक्काच. विहिरीत काहीच दिसेना मात्र मन घाबरले. त्यांनी मोठ्याने हंबरडा फोडला असता जवळच काम करत असलेले शेतकरी धावून आल्यानंतर माजी सरपंच व पोलिसपाटील आदींनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. 

हेही वाचा > सोन्याचे बिस्किट हाती लागले पण श्रीमंत होण्याचे स्पप्न भंगले!

शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार 

जायखेडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक श्रीकृष्ण पारधी व पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. स्थानिक नागरिकांनी विहिरीत शोध घेतला असता विहिरीला पन्नास फुटांहून अधिक पाणी असल्याने मृतदेह मिळाला नाही. त्यामुळे मालेगाव येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. जवळपास पाच तासांच्या अथक परिश्रमानंतर मृतदेह आढळला. नामपूर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. यू. पी. हेंद्रे यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जायखेडा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली असून, तपास सुरू आहे. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून, मुली, भाऊ असा परिवार आहे. 

हेही वाचा > 'आज कुछ तुफानी' करणे चांगलेच भोवले! तब्बल सहा तासांनंतर भावंडांची सुटका