ड्रग्ज पेडलर्सने दडविलेला एमडी साठा जप्त

ड्रग्जविरुद्धची लढाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; सामनगाव येथील गुन्ह्यात अटक केलेल्या ड्रग्ज पेडलर्स अर्जुन पिवाल, सनी पगारे यांनी लपवलेले ड्रग्ज शहर पोलिसांनी जप्त केल्याचे सुत्रांनी सांगितले. काही किलोंमध्ये हा साठा असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे या गुन्ह्याची व्याप्ती वाढत असल्याचे चित्र आहे.

नाशिकरोड पोलिसांनी ७ सप्टेंबरला १० ग्रॅम एमडीसह गणेश शर्मा यास अटक केली होती. या गुन्ह्याचा तपास करत नाशिकराेड व अंमली पदार्थ विरोधी पथकाने एकूण आठ संशयित पकडले. त्यात शहरातील महत्वाचे ड्रग्ज पुरवठादार व त्यांना ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील संशयितास पकडले. या संशयितांच्या चौकशीतून अर्जुन, सनी सुमीत, मनोज यांनी एमडीचा साठा शहरातच लपवल्याचे उघड झाले. पोलिसांनी काही ठिकाणी झडती घेत एमडी साठा जप्त केल्याचे सुत्रांनी सांगितले. या प्रकरणातील मुख्य पुरवठादारही पोलिसांच्या रडारवर असून त्यांनाही अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक मागावर असल्याचे सुत्रांनी सांगितले.

हेही वाचा :

The post ड्रग्ज पेडलर्सने दडविलेला एमडी साठा जप्त appeared first on पुढारी.