
नाशिकरोड: पुढारी वृत्तसेवा; मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी छापा टाकून उजेडात आणलेला शिंदे गाव औद्योगिक वसाहतीमधील एमडी ड्रग्स कारखान्यात सध्या शुकशुकाट असून पोलिस बंदोबस्त नसल्याने कारखान्याच्या आतमध्ये कोणतीही व्यक्ती केव्हाही सहज प्रवेश करू शकतो. या प्रकरणातील पुरावे नष्ट केले जाऊ शकतात, अशी शक्यता आहे. येथील सुरक्षा राम भरोसे आहे की काय? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जातो आहे.
नाशिक – पुणे महामार्गाजवळ शिंदे गावातील औद्योगिक वसाहतीमध्ये एका उंच डोंगरावर एमडी ड्रग्स निर्मिती कारखाना नुकताच तपासात उघड झाला. साकीनाका पोलिसांनी छापा टाकून ड्रग्सचा कच्चा माल जप्त केला. सद्स्थितीत काखान्यात शुकशुकाट असून बेवारस स्थितीतीत कारखाना आहे. येथील ड्रग्स निर्मितीसाठी वापरले जाणारे साहित्य सगळीकडे अस्तव्यस्थ पडलेले दिसते. पत्र्याच्या शेडमध्ये असलेल्या कारखान्याच्या खिडक्या उघड्या आहे. आतमध्ये असणारे सामान बाहेरून स्पष्ट दिसते. काही मोठ्या तर काही छोट्या पण महत्वाच्या महागड्या वस्तू आतमध्ये आहे. ड्रग्स निर्मितीसाठी लागणारी प्रत्येक वस्तू उघड्या खिडकीतून दिसते. आतमध्ये कोणताही व्यक्ती सहज प्रवेश करता येऊ शकतो, कारखान्याच्या चारही बाजूने कच्ची संरक्षण भिंत आहे, भिंतीलगत मोठे ड्रम, केमिकल्स, चिमणी, लोखंडी मशनरी आदी किरकोळ वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या आहे.
पोलीस बंदोबस्त का नाही ? चौकट
शिंदे येथील एमडी ड्रग्स कारखाना साकी नाका पोलिसांनी उजेडात आणला, त्यानंतर यातील संशयीत मुख्य सूत्रधार ललित पाटील आणी त्याचा भाऊ भुषण पाटील दोघांनाही पोलिसांनी अटक केली. संपुर्ण महाराष्ट्रात हे प्रकरण चर्चेत आहे. या ड्रग्स कारखान्यावरून महाराष्ट्रातील राजकारण पेटलय. नाशिकला मोर्चे निघाल्याने अनेक घडामोडीचे केंद्र असलेल्या एमडी ड्रग्जनिर्मित कारखान्याच्या सुरक्षिततेकडे पोलीस यंत्रणेचे दुर्लक्ष झालेले दिसते. येथे एकही पोलीस कर्मचारी देखभालीसाठी नियुक्त नाही.
कारखान्याला सुरक्षा व्यवस्था नाही : राऊत
शिंदे गाव औद्योगिक वसाहती मधील एमडी ड्रग्स निर्मिती कारखान्याला पोलीस बंदोबस्त आहे किंव्हा नाही, याविषयी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांना विचारले असता त्यांनी नाही असे उत्तर दिले.


हेही वाचा :
- ‘तेज’मुळे अशी असेल महाराष्ट्रात पावसाची स्थिती !
- Navratri 2023 : खंडेनवमी विशेष : शौर्यशाली वारसा सांगणारी ‘ही’ आहेत मराठाकालीन शस्त्रास्त्रे
The post ड्रग्ज प्रकरणातील पुरावे नष्ट केले जाण्याची शक्यता appeared first on पुढारी.