ढकांबे पेट्रोलपंप दरोडा प्रकरणी दोन संशयित ताब्यात

arrested,www.pudhari.news

दिंडोरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; तालुक्यातील ढकांबे शिवारातील पेट्रोलपंपावर दरोडा प्रकरणातील दोन संशयितांना नाशिक ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांच्या इतर साथीदारांचा शोध घेतला जात आहे.

पालखेड चौफुली परिसरात सापळा रचून ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे सुनील रमेश डंबाळे (वय २४) व ज्ञानेश्वर सदू गायकवाड (वय २१) दोघे रा. कापाची करंजाळी, ता. दिंडोरी अशी आहेत. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी साथीदार किरण दशरथ माळेकर, अनिल बाळू माळेकर (रा. कापाची करंजाळी, ता. दिंडोरी) व राहुल वारडे (रा. सारसाळे, ता. दिंडोरी)सह मिळून गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांच्या कब्जातून गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी, चोरलेले कामगारांचे दोन मोबाइल व पिस्टलसारखे दिसणारे लायटर असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. दोघा संशयितांना न्यायालयाने तीन दिवस पोलिस कोठडी दिली आहे. गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक कैलास देशमुख, दिंडोरी पोलिस स्टेशन हे करीत आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील, सागर कोते, गणेश शिंदे, संदीप पाटील, नाना शिरोळे, नवनाथ सानप, विश्वनाथ काकड, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, शरद मोगल यांच्या पथकाने गुन्हा उघडकीस आणला. पथकास पोलिस अधीक्षक उमाप यांनी १० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करून अभिनंदन केले.

हेही वाचा :

The post ढकांबे पेट्रोलपंप दरोडा प्रकरणी दोन संशयित ताब्यात appeared first on पुढारी.