ढगाळ हवामानामुळे वाढला उकाडा! रात्रीही उष्मा वाढल्याने नाशिककर हैराण

नाशिक : नाशिक शहरात रविवारी (ता. १४) दुपारनंतर ढग दाटून आल्यामुळे उकाड्यात वाढ झाली होती. तसेच दोन दिवसांच्या तुलनेत रविवारी (ता. १४) तापमानात वाढ झाल्याने उष्णताही वाढली आहे.

ढगाळ हवामानामुळे वाढला उकाडा 

शहरात रविवारी कमाल तापमान ३५.१, तर किमान तापमान १७.५ अंश सेल्सिअस होते. दुपारनंतर शहरात ढगाळ वातावरण सायंकाळपर्यंत कायम असल्याने उष्णताही वाढली होती. दिवसभराच्या ढगाळ वातावरणामुळे रात्रीही उष्मा वाढला होता.

हेही वाचा - नाशिकमधील धक्कादायक घटना! कुटुंबाचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न; पोलीस तपास सुरू

रात्रीही वाढला उष्मा

नाशिक शहरात शनिवारी (ता. १३) तापमान कमाल ३४.२, किमान १६.२ अंश सेल्सिअस होते. शुक्रवारी (ता. १२) कमाल ३४.७, किमान १६.६ अंश सेल्सिअस होते. रविवारी तापमानात वाढ झाली होती. त्यात ढगाळ वातावरणामुळे उकाडा आणखी वाढल्याचे चित्र होते.

हेही वाचा - दुर्दैवी अपघात आणि महापालिका कर्मचाऱ्याचे अख्खे कुटुंब उध्वस्त; ५ वर्षीय चिमुरडा ठार, पत्नी गंभीर