तपोवन खून प्रकरणाचा अखेर पोलिसांकडून छडा; धक्कादायक माहिती समोर

नाशिक : तपोवन येथील रामटेकडी परिसरातील युवतीच्या खून प्रकरणाचा छडा लावण्यास पोलिसांना यश आले. पोलिसांना घटनास्थळावरून सोनोग्राफी सेंटरची फाइल सापडली होती. त्यावरील माहितीच्या आधारे पोलिस खुनाचा तपास करत होते. सेंटर तसेच परिसरातील सिसीटीव्ही कॅमर्यातून मिळालेल्या फुटेजनुसार पोलिस संशयितापर्यंत पोचले.त्यानंतर धक्कादायक माहिती समोर आलाी आहे. 

युवती तीन महिन्याची गर्भवती होती...

पोलिसांना घटनास्थळावरून सोनोग्राफी सेंटरची फाइल सापडली होती. त्यावरील माहितीच्या आधारे पोलिस खुनाचा तपास करत होते. सेंटर तसेच परिसरातील सिसीटीव्ही कॅमर्यातून मिळालेल्या फुटेजनुसार पोलिस संशयितापर्यंत पोचले. मंगळवारी (ता. १५) सकाळी संशयित दानिश कुरेशी याला घरातून ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. मृत युवतीचे जैनब कुरेशी नाव असल्याचे सांगितले. संशयित युवतीचा सख्खा चुलत भाऊ असल्याची माहिती समोर आली आहे. युवती तीन महिन्याची गर्भवती होती. पतीच्या नात्याने दवाखान्यात घेऊन जात गर्भपात करून देण्याचा तगादा संशयिताकडे लावत होती. अन्यथा तुझेच नाव घेईन अशी धमकी देत होती. सततच्या धमकीला वैतागून संशयिताने तिला मारण्याचा कट रचला.

हेही वाचा - दुर्दैवी! एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा

मोबाईल लोकेशनवरून गुन्हा उघडकीस

तपोवनमध्ये एक वैद्य आहे. त्याकडील औषध, जडीबुटीने गर्भपात करून देतो, असे सांगत शनिवारी (ता. ५) रात्री दोनच्या सुमारास तिला दुचाकीवर बसवून घटनास्थळी नेले. त्याठिकाणी तिचा गळा दाबून तसेच डोक्यात दगड टाकून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर त्याने मृतदेहावर चंदेरी प्लॅस्टिक कापड टाकून तेथून पळ काढला होता. बदनामी होऊ नये, यासाठी उपचारादरम्यान चुकीचे नाव सांगितले होते. त्यामुळे फाइलवर तेच नाव आले होते. कुजलेला मृतदेह आणि कुटलाही ठोस पुरावा नाही. पोलिसांना तपासात अडचण येत असताना भद्रकाली गुन्हे पथक आणि गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने सोनोग्राफी सेंटरमधील आणि परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरयाचे फुटेज, मोबाईल लोकेशनवरून गुन्हा उघडकीस आणला. 

हेही वाचा - धक्कादायक! तपोवन परिसरात आढळला युवतीचा विवस्त्र मृतदेह; परिसरात खळबळ

बेपत्ता असताना कुटुंबीयांकडून नोंद नाही? 
युवती शनिवार(ता. ५) पासून बेपत्ता आहे. ती कुठे व कशी असेल याची माहिती कुटुंबीयांनी का जाणून घेतली नाही. इतक्या दिवसापासून तपास लागत नाही. तरीही ती बेपत्ता असल्याबाबत पोलिस ठाण्यात नोंद का केली नाही, असे प्रश्‍न पोलिसांसमोर उपस्थित होत आहे. यामुळे खुनाचे हेच कारण आहे का, अन्य काही कारण आहे, इतरही कुणाचा सहभाग आहे का, याचे गूढ कायम आहे.