तपोवन परिसरातील युवतीचा मृतदेह : खुनाचा गुन्हा दाखल; दोन ते तीन दिवसांत प्रकरण उघडकीस येण्याची पोलिसांना आशा

नाशिक :. तपोवन परिसरातील मोकळ्या भूखंडावर अज्ञात युवतीचा विवस्त्र मृतदेह आढळून आल्याने परिसरात खडबळ उडाली होती. शनिवार (ता.१२) दुपारी सुमारे साडेतीन वाजेच्या सुमारास प्रकार उघकीस आला. दोन ते तीन दिवसांत प्रकरण उघडकीस येण्याची पोलिसांना आशा आहे.

दोन ते तीन दिवसांत प्रकरण उघडकीस येण्याची पोलिसांना आशा

गुन्हे शोधपथकाच्या उपस्थितीत शनिवारी कुजलेल्या मृतदेहाचे जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले. मृतदेह अंदाजे १७ ते २५ वयाच्या युवतीचा असून, डोक्यावर हत्याराने आघात केल्याचे आढळले आहे. आज दुसऱ्या दिवशी पोलिसांनी घटनास्थळी तपासणी केली. त्यात, सोनोग्राफीचे अहवाल असलेली फाइल पोलिसांना मिळाली. त्यावरून संबधित मृत युवती नाशिक रोड परिसरातील असल्याच्या अंदाजावरून पोलिसांनी नाशिक रोडला तसेच काही सोनोग्राफी सेंटरमधील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. युवतीचा घात-पात झाला असण्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून त्या दिशेने पोलिस तपास करीत आहे.

हेही वाचा - धक्कादायक! तपोवन परिसरात आढळला युवतीचा विवस्त्र मृतदेह; परिसरात खळबळ

खुनाचा गुन्हा दाखल

याशिवाय इतरही काही महिती हाती आल्याने दोन ते तीन दिवसांत प्रकरण उघडकीस येण्याची पोलिसांना आशा आहे. भद्रकाली पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस उपायुक्त अमोल तांबे, साहाय्यक पोलिस आयुक्त दीपाली खन्ना यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यानी घटनास्थळी भेट देत पहाणी केली. डोक्यावर जोरदार वार करण्यात आल्याचे शवविच्छेदनात स्पष्ट झाल्याने भद्रकाली पोलिसांनी रविवारी (ता.१३) खुनाचा गुन्हा दाखल केला.

हेही वाचा - दुर्दैवी! एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा