तरुणाई रमतेय छोटेखानी साहित्यात…!

पुस्तक www.pudhari.news

नाशिक : निमित्त- दीपिका वाघ

तरुणपिढी वाचत नाही, असा आक्षेप सतत घेतला जातो. पण तरुणपिढीने वाचावं, अशी ‘वाचनसंस्कृती’ आपण त्यांच्यात रुजवलीय का? अलीकडच्या काही वर्षांत तरुणांची वाचनाची आवड याबाबत अधूनमधून सतत चर्चा होत असते. साहित्य संमेलनाच्या वेळी तर ती हमखास होतेच. शाळा-महाविद्यालयांत तरुणांमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. ‘पुलं’ एका कार्यक्रमात असे म्हणाले होते की, ‘वर्तमानपत्रातील छोट्या जाहिरातींपासून निधन वार्तांपर्यंत मी काहीही वाचतो.’ परंतु आज वर्तमानपत्र घरातील ज्येष्ठांच्याच हातात दिसते. घरातील तरुण त्याकडे बघतही नाही. ‘मला मोबाइलवर सर्व अपडेट्स मिळतात, मी कशाला वर्तमानपत्र वाचू?’ असा खोचक प्रश्न ते करू लागले आहेत. एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात असताना घरातील आजी-आजोबा सायंकाळच्या वेळेला नातवंडांना घेऊन परवचा, मनाचे श्लोक, शुभंकरोती यांसारख्या गोष्टींची घोकंपट्टी घेत. जसजसे घर विभक्त होऊ लागले तसतस ‘हम दो-हमारे दो’वर संसार खुंटल्यानंतर आई-वडील कामावर असताना मुलं एकटी राहू लागल्याने त्यांना टीव्ही आणि मोबाइलचे वेड लागले. त्यात ती इतकी गुरफटली की, हातातील गोष्टीच्या पुस्तकांना त्यांनी बाजूला सारले आणि वाचक संस्कृतीचा र्‍हास व्हायला सुरुवात झाली. त्या अनुषंगाने लेखक-भेटी, मुलाखती, वाङ्मयीन कार्यक्रम यांचे सातत्याने आयोजन करायला हवे. साहित्य संमेलनांसारख्या मोठ्या साहित्यिक उपक्रमांमध्ये तरुणांना अधिकाधिक प्रमाणात सहभागी करून घेता येईल, अशा कार्यक्रमांची संख्या वाढवायला हवी.

सार्वजिनक वाचनालयाच्या वतीने तरुणांना वाचनासाठी आकृष्ट करण्यासाठी नाममात्र शुल्क भरून मोफत पुस्तक योजना उपलब्ध करून दिली होती. पण, सावानाचे अध्यक्षच जर ऑनलाइन वाचन करत असतील तर तरुणांकडून वाचनाची अपेक्षा तरी कशी करता येईल? त्यामुळे योजनेला शून्य प्रतिसाद मिळाला. ही वस्तुस्थिती आहे तर मग आताची तरुणाई वाचतच नाही का? महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पाच लेखकांची वा पाच पुस्तकांची नावे विचारली तरी धड सांगता येणार नाही ही आजच्या तरुणाईची सद्यस्थिती आहे. पण त्यांना मिम्स, रॅप, रिल्सची भाषा समजते. मोठमोठ्या कादंबर्‍या वाचण्यात तरुणांना काही रस नसतो. त्यांच्या साहित्याच्या आवडीमध्ये बदल होत आहे. अलंकारिक जड भाषेपेक्षा कमीतकमी शब्दांत अर्थपूर्ण, हलकीफुलकी भाषाशैली, बोल्ड कंटेट वाचण्यात त्यांना जास्त रस असतो. तुमच्या माझ्या आयुष्यात घडणारे प्रसंग किंवा काळाच्या पुढे जाऊन लिहिणारे लेखक आजच्या पिढीला आवडतात. महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांना पाच लेखकांची नावे विचारली तरी सांगता येणार नाही अशी आजची स्थिती आहे. सार्वजिनक वाचनालयाच्या वतीने तरुणांना वाचनासाठी आकृष्ट करण्यासाठी नाममात्र शुल्क भरून मोफत पुस्तक उपलब्ध करून दिली; पण त्याला शून्य प्रतिसाद मिळाला. सावानाचे अध्यक्ष ऑनलाइन वाचत असतील तर तरुणांकडून वाचनाची अपेक्षा कशी करता येईल? डिसेंबरच्या अखेरच्या सप्ताहात सावाना ग्रंथसप्ताह आयोजित करण्यात आला होता. सावानाचे 10 हजार वाचक सभासद असताना सुद्धा 100 च्या आसपास प्रेक्षक कार्यक्रमाला बघायला मिळाले नाही. ही वस्तुस्थिती आहे. मग तरुणाई वाचतच नाही का? प्रोजेक्ट संदर्भासाठी किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी विद्यार्थी वाचनालयाचा तेवढा आधार घेतात. शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी जशी अन्नाची गरज असते तशी मेंदूला विविध खाद्याची गरज असते. 90 च्या दशकातला तरुण टीव्हीला जोडलेला होता. नंतर टीव्हीवरचा कंटेट जसा भरकटत गेला तसा टीव्हीचा प्रेक्षक हा सोशल मीडियावर रमायला लागला. रियालिटी शोचे राजकारण, रटाळ मराठी मालिका, सतत ओरडणारे न्यूज चॅनल यामुळे टीव्हीचा प्रेक्षक कमी होऊ लागला. सोशल मीडियावर काय वाचायला मिळत? तर विविध विषयांवर लेखन करणारे पोस्टच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांची मांडणी करणारे लेखक तरुणांना आवडतात. जाड जाड पुस्तके वाचण्यापेक्षा कमीत कमी शब्दांत अर्थपूर्ण वाचणारा कंटेट तरुणवर्गाला सर्वात जास्त आवडतो. काळाच्या पुढे जाऊन लिहिणारे लेखक आणि तुमच्या माझ्या आयुष्यात घडणार्‍या घडामोडींचे विषय वाचायला अधिक पसंती मिळते. कितीतरी लेखकांनी फेसबुकवर लिहिलेल्या पोस्टचे पुस्तक लिहिले आहे.

मिम्सच्या दुनियेत…
मिम्स, रॅप, पोस्ट या छोटेखानी साहित्याला तरुणाई अधिक पसंती देते. मिम्स कमीत कमी शब्दांत अर्थपूर्ण सांगणारे असतात म्हणून फेसबुवर मिम्सचे हजारो फॉलोवर्स असणारे ग्रुप्स आहेत. तिथे मिम्सच्या थीमवर आधारित स्पर्धा घेतल्या जातात. स्पर्धेत ज्या मिमला सर्वाधिक लाइक्स मिळतील त्याला विशेष बक्षीस दिले जाते. इथे भाषेचे कोणतेही बंधन नसते. बोल्ड कंटेट, राजकारण, धर्म, जात, लिंग अशा कोणत्याही विषयाचे बंधन इथे लादली जात नाही. त्यामुळे इथे तरुणाई मनमोकळेपणाने व्यक्त होते आणि त्यांची क्रिएटिव्ह बघायला मिळते. या ठिकाणी तरुण अधिक रमलेले दिसून येतात. मिम्स बनवण्यासाठी खास अ‍ॅप्लिकेशन असतात. टेम्लेटमध्ये पाहिजे तसा कंटेट तुम्ही बनवू शकतात, पण त्यासाठी क्रिएटिव्हीटी लागते. तसेच एका रॅपरच्या आयुष्यावर गली बॉय सिनेमाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. इंटरनेट जगात वावरणार्‍यांना रॅपर सृष्टी तावडे माहिती असेलच. तिने बनवलेले रॅप आणि त्यावर तयार झालेले रिल्स तरुण जगात फेमस आहेत. मै नही तो कौन बे, मेरा बचपन कहाँ, भगवान बोल रहा हूँ हे तिचे लोकप्रिय आहेत. रॅप पॉप कल्चरच्या माध्यमातून तिने तिचे लेखन रॅपच्या माध्यमातून मांडले आहे. जाता जाता एवढच की साहित्यात बदल होतोय तो बदल स्वीकारणे आता काळाची गरज आहे.

The post तरुणाई रमतेय छोटेखानी साहित्यात...! appeared first on पुढारी.