तरुणाकडून धक्कादायक वस्तू सापडताच पोलीसही हैराण! युवावर्गाला सहज मिळणाऱ्या गोष्टीचा लावणार शोध?

नाशिक : इंदिरानगर परिसरात तरुणाकडे मिळालेल्या धक्कादायक गोष्टी पाहताच पोलीसही हैराण झाले आहेत, युवावर्गाला सहज मिळणाऱ्या गोष्टीची पाळेमुळे खोदून काढण्याचे आश्वासन पोलिस आयुक्तांनी दिले होते. मात्र, याबाबत विशेष काही घडले नसल्याची स्थिती आहे.  

इंदिरानगरमधून तरुणाकडून धक्कादायक वस्तू जप्त

अनुज गंगाप्रसाद विश्‍वकर्मा (वय १८, रा. अंजना लॉन्सजवळ, इंदिरानगर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. गुन्हे शाखा दोनच्या पथकातील पोलिस नाईक मोतीलाल महाजन यांना गुप्त माहिती मिळाली. त्यावरून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अजय शिंदे, सहाय्यक आयुक्त श्रीराम पवार, उपनिरीक्षक मिथुन म्हात्रे, हवालदार यशवंत बेंडकुळे, बाळासाहेब नांद्रे, महेंद्र साळुंखे, योगेश जगताप यांनी सोमवारी (ता. ११) दुपारी अंजना लॉन्स परिसरातील बिल्डिंग मटेरियलच्या शॉपमधून संशयितास ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे धारदार तीन लवारी, तीन चाकू अशी सहा हत्यारे आढळून आली. त्याच्यावर इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

हेही वाचा > संतापजनक प्रकार! शेजारीणच झाली वैरीण; 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिले नराधमांच्या ताब्यात

ही हत्यारे कोठून व कशी येतात? पोलीसांना लक्ष देण्याची गरज
इंदिरानगर परिसरात बेकायदेशीर हत्यारे जवळ बाळगणाऱ्यास शहर गुन्हे शाखा दोनच्या पथकाने शिताफीने अटक केली. त्याच्याकडून तीन तलवारी व तीन धारदार चाकू, अशी सहा हत्यारे जप्त केली. शहर व परिसरात युवावर्गाला सहज चाकूसारखी हत्यारे उपलब्ध होत असल्याचे वास्तव आहे. पोलिसांनी यापूर्वी कारवाई करून मोठ्या प्रमाणावर हत्यारे जप्त केली आहेत. ही हत्यारे कोठून व कशी येतात, याची पाळेमुळे खोदून काढण्याचे आश्वासन पोलिस आयुक्तांनी दिले होते. मात्र, याबाबत विशेष काही घडले नसल्याची स्थिती आहे.  

हेही वाचा > बहिणीच्या लग्नात भावाने दिले अनोखे 'गिफ्ट'; अख्ख्या पंचक्रोशीत होतेय चर्चा