तरुणीनंतर विहीरीत तरुणाचाही मृतदेह फूगून वर आला; परिसरात एकच खळबळ

निफाड (जि.नाशिक) : विहिरीत गुलाबी साडी, काळा टॉप, पिवळी लेगीज, उजव्या हातात घड्याळ, डाव्या हातात कडे, पायात बाजारातील तोरड्या, गळ्यात बाजारू मंगळसूत्र अशा पेहरावातील समारे २५ वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळला. आणि काही वेळानंतर जेव्हा आणखी एका तरुणाचा मृतदेह फुगून वर आला तेव्हा परिसरात खळबळ माजली...काय घडले नेमके?

तरुणीनंतर विहीरीत तरुणाचाही मृतदेह फूगून वर आला

भरवस फाटा-कोळपेवाडी राज्य महामार्ग क्रमांक ७ वर असलेल्या देवगाव फाट्यानजीक भाऊसाहेब भीमराव शिंदे यांच्या गट क्रमांक १८६ मधील विहिरीत गुलाबी साडी, काळा टॉप, पिवळी लेगीज, उजव्या हातात घड्याळ, डाव्या हातात कडे, पायात बाजारातील तोरड्या, गळ्यात बाजारू मंगळसूत्र अशा पेहरावातील समारे २५ वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळताच लासलगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक राहुल वाघ यांच्यासह हवालदार डी. के. ठोंबरे, डी. डी. पानसरे, कोते, किशोर वाणी, मस्तागर आदी घटनास्थळी आले. मृतदेह बाहेर काढत विच्छेदनासाठी निफाड ग्रामीण रुग्णालयात पाठविला. दरम्यान, सायंकाळी पावणेआठच्या सुमारास आणखी एका तरुणाचा मृतदेह फुगून वर आला.

हेही वाचा > भुजबळांची बिअर बारमध्ये धाड! बिल न देताच मद्यपींचा पोबारा; दिवसभर चर्चेला उधाण 

तरुणाची ओळख पटली

देवगाव फाट्यानजीक विहिरीत तरुण व तरुणीचा मृतदेह सोमवारी (ता. २९) आढळला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. रविवारी (ता. २८) सकाळी येथे सागर भाऊसाहेब वेताळ याच्या मालकीची दुचाकी (एमएच ४१, एएच ७५६०)ही आढळून आली होती. याबाबत लासलगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान, मृत तरुणाची ओळख पटली असून, त्याचे नाव सागर वेताळ (रा. येसगाव, ता. मालेगाव) असे आहे.  

हेही वाचा > दुसऱ्या लाटेत कोरोनाने बालकांना घेरले! हृदय, मेंदूवर आघात होत असल्याची बाब उघड