नाशिक : पुढारी वृत्तसेवा- अंधारात लपून तरुणीस चाकूचा धाक दाखवून तिच्याकडील मोबाइल हिसकावून पळून जाणाऱ्या संशयितास गंगापूर पोलिसांनी पकडले आहे. मयुर गजानन वांद्रेकर (२६, रा. शिवाजी नगर) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे.
गंगापूर रोडवरील शिवाजी नगर परिसरात २३ वर्षीय तरुणी २३ फेब्रुवारीला रात्री आठच्या सुमारास घराबाहेर पडल्या. मात्र पार्किंगमध्ये अंधार असल्याचा फायदा घेत तेथे संशयित मयुर लपला होता. त्याने तरुणीस चाकुचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच तरुणीकडील मोबाइल चोरून नेला. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास करीत संशयित मयुर यास त्र्यंबकेश्वर मधील खंबाळे येथून पकडले. पोलिसांनी त्याच्याकडून तरुणीचा मोबाइल व गुन्ह्यात वापरलेले शस्त्र हस्तगत केले आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय भिसे, हवालदार गिरीष महाले, सुजीत जाधव यांनी संशयितास पकडले. न्यायालयाने मयुर यास एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
हेही वाचा :
- Nashik News : ब्रेकअप केल्याचा राग आला, प्रेयसीने मोडलं प्रियकराचं ठरलेलं लग्न
- फडणवीसांना धमकी देणारी पोस्ट शेअर केल्याप्रकरणी एकाला अटक
- बीड : परळी नगर परिषदेमध्ये चोरी झाल्याच्या घटनेने खळबळ
The post तरुणीला चाकूचा धाक दाखवून मोबाईल हिसकावणारा गजाआड appeared first on पुढारी.