
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
तलाठी परीक्षेत हायटेक कॉपी केल्याचा प्रकार शहर पाेलिसांनी उघडकीस आणला. या प्रकरणात पोलिसांनी गणेश श्यामसिंग गुसिंगे (२८, रा. ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) याला अटक केली आहे. गुसिंगेच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्याला मंगळवारी (दि. २२) पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने गुसिंगेच्या पोलिस कोठडीत शुक्रवार (दि. 24) पर्यंत वाढ केली आहे. दरम्यान, शहर पोलिस इतर दोन संशयितांचा शोध घेत आहेत.
म्हसरूळ येथील परीक्षा केंद्रात गुरुवारी (दि. १७) तलाठी परीक्षा सुरू होती. ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या या परीक्षेत परीक्षार्थी संगीता रामसिंग गुसिंगे (२१) हिने संशयित गणेश व सचिन नायमाने यांच्याशी संगनमत करून कॉपी केल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी पोलिसांनी गणेशला पकडले असून, संशयित संगीता व गणेश हे दोघे फरार आहेत. न्यायालयाने गणेशच्या पोलिस कोठडीत शुक्रवारपर्यंत वाढ केली आहे. तर या गुन्ह्याच्या तपासासाठी नियुक्त दहा जणांचे स्वतंत्र पथक दोन फरार संशयितांच्या मागावर आहेत.
हेही वाचा :
- धरण सुधारणा : ‘राधानगरी’ला प्राधान्य आवश्यक!
- Chandrayaan-3 : पंतप्रधान मोदी दक्षिण आफ्रिकेतून पाहणार ‘चांद्रयान-3’ चे लाईव्ह लँडिंग
- Chandrayaan-3 Moon Landing Live Updates | चांद्रयान-३ च्या सॉफ्ट लँडिंगचे थेट प्रक्षेपण ‘इथे’ पाहा?
The post तलाठी परीक्षा गैरप्रकारातील गुसिंगेच्या कोठडीत वाढ appeared first on पुढारी.