”तान्हाजी – द लायन”ची ”पब्जी”ला टक्कर! नाशिककर ‘वैभव’च्या स्टार्टअपचा अनोखा गेम

नाशिककर महाजनांच्या स्टार्टअपचा अनोखा गेम

नाशिक : सध्या तरुणाईमध्ये गेमिंगची प्रचंड आवड पाहायला मिळतेय. त्यातही युध्दनितीचे मोबाईल गेम्स युवकांच्या पसंतीस उतरत आहेत. त्यातून पब्जी अन् फौजी सारख्या गेम्सला लोकप्रियता मिळालेली आहे. परंतु युवकांना गेमिंगचा आनंद देताना आपल्या मराठमोळ्या योध्दांचे कर्तृत्व पोहचविणाऱ्या उद्देशाने आबराका डाबरा सॉफ्टवेअर सोल्युशन प्रा. लि. या स्टार्टअपने "तान्हाजी : द लायन मराठा वॉरियर'' हे गेमिंग अ‍ॅप विकसित केले आहे. या अ‍ॅपला अल्पावधीतच चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

तान्हाजी - द लायन ची पब्जीला टक्कर

(ता.४) फेब्रुवारी रोजी तान्हाजी मालुसरे यांचा स्मृतिदिन.. त्यांची गौरवगाथा संपूर्ण महाराष्ट्रासह देशभराला ज्ञात आहे. कोंढाणा किल्ला जिंकत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या स्वप्नपूर्तीत तानाजी मालुसरे यांनी हातभार लावला होता. त्यांची कामगिरी तरुणांमध्ये रंजक पध्दतीने पोहचविताना गेमिंगचा आनंद घेण्याचे दुहेरी उद्देश साध्य करण्यासाठी आबराका डाबरा सॉफ्टवेअर सॉल्युशन्स या स्टार्टअपने हे मोबाईल गेमिंग अ‍ॅप विकसित केले. गेल्या १ जानेवारीला हे अ‍ॅप प्ले स्टोअरवर उपलब्ध करून दिले असून, त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

हेही वाचा - ही कसली स्टंटबाजी? पठ्ठ्याचे शेतात चक्क बिबट्यासोबत फोटोसेशन; VIDEO व्हायरल

असे आहे गेमिंग अ‍ॅप?
या गेमिंग अ‍ॅपमध्ये पारंपारिक शस्त्रांचा वापर करताना शत्रुला धूळ चारत कोंढाणा किल्ला सर करण्याचे आव्हान पूर्ण करायचे असते. सद्यस्थितीत बारा लेव्हल उपलब्ध असून, पुढील टप्प्यात आणखी विस्ताराचे धोरण ठेवलेले आहे. सध्या आर्टिफिशीयल इंटेलिजिन्सच्या आधारे स्पर्धकांना कॉम्प्युटर प्रोग्रामच्या आव्हांनाना सामोरे जावे लागते. परंतु, आगामी काळात प्रतिस्पर्ध्यासोबत स्पर्धा करताना गेमिंगचा आनंद घेण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. 

हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच

आम्ही १ जानेवारीला अनावरण केलेल्या 'तान्हाजी : द वॉरियर' या गेमिंग अ‍ॅपला देश- विदेशातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तान्हाजी मालुसरे यांच्या कार्याचा गौरव करताना अन्य गेमिंग अॅपला पर्याय उपलब्ध करून देण्याचा आमचा उद्देश आहे - वैभव महाजन, सीईओ, आबरा का डाबरा सॉफ्टवेअर सोल्युशन