तिन्ही भावंडं भारतीय सैन्यदलात; तरीही गणेशने हारली हिम्मत, ह्रदयद्रावक घटनेने गावात हळहळ

निफाड (जि.नाशिक) : गणेशचे वडील सखाहरी कोल्हे यांच्या मालकीची एक हेक्टर तीन आर जमीन असून, त्यांची अन्य तीन भावंडे भारतीय सैन्य दलात आहेत. तर बहिणीचा विवाह झालेला आहे. असा मोठा परिवार असूनही त्यांचा कोणत्याच विचार त्या क्षणी आला नाही. घडलेल्या घटनेने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे,

गणेशने घेतला टोकाचा निर्णय

गणेशच्या साथीने त्यांनी शेतात द्राक्षबाग, अँगल आदींसाठी बँक ऑफ महाराष्ट्रच्या उगाव शाखेतून सहा लाखांपेक्षा जास्त पीककर्ज व मध्यम मुदत कर्ज घेतले होते. गेल्या पाच-सहा वर्षांत कधी गारपीट, कधी अवकाळी पाऊस, तर कधी कोसळणारे बाजारभाव यामुळे शेतीचे उत्पन्न घटले. त्यामुळे कर्जाची एकूण रक्कम व्याजासह जवळपास तेरा लाखांच्या घरात गेली. महाविकास आघाडी सरकारने दिलेल्या कर्जमाफीचा त्यांना कोणताही लाभ मिळाला नाही. त्यातूनच आलेल्या नैराश्‍यामुळे गणेशने बुधवारी (ता. ६) आपल्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. घरी लवकर न आल्याने चौकशी केल्यानंतर ही बाब लक्षात आली. उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर खेडे येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गणेश यांच्या मागे आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, तीन भाऊ, विवाहित बहीण असा परिवार आहे. तलाठी श्री. मोरे यांनी कोल्हे कुटुंबीयांची भेट घेऊन जाबजबाब नोंदवून घटनेचा सविस्तर अहवाल निफाड तहसीलदार यांना सादर केला आहे.  

हेही वाचा > नियतीची खेळी! एका मित्राला लागली हळद ,तर दुसऱ्याला दिला अग्नि; अक्षयच्या अवेळी जाण्याने परिसरात हळहळ

तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

गेल्या चार ते पाच वर्षांपासून अवकाळी पाऊस, द्राक्षाचे सतत कोसळणारे भाव, कोरोनामुळे मातीमोल भावाने विकावी लागलेली द्राक्ष व वातावरणात झालेल्या बदलांमुळे घटलेले उत्पन्न यामुळे डोक्यावर वाढलेल्या कर्जाच्या बोजास कंटाळून खेडे (ता. निफाड) येथील गणेश सखाहरी कोल्हे(वय ३३) या तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. 

हेही वाचा > माहेरहून सासरी निघालेली विवाहिता चिमुकलीसह प्रवासातच गायब; घडलेल्या प्रकाराने कुटुंबाला धक्काच