तीनदिवसीय ‘जनता कर्फ्यू’ला मनमाडमध्ये शंभर टक्के प्रतिसाद

मनमाड (जि. नाशिक) : मनमाड शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा धोका वाढत असून, समूहसंसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने पुकारलेल्या ‘जनता कर्फ्यू’च्या सोमवारी (ता. २२) तिसऱ्या दिवशीही शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. अगदी तीन दिवस कडकडीत बंद पाळण्यात आला. त्यामुळे बाजारासह बाजारपेठेतील रस्त्यांवर शुकशुकाट होता. कोरोनाच्या धास्तीने अनेकांनी घराबाहेर न पडणे पसंद केले.

कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने समूहसंसर्गाची भीती व्यक्त केली जात आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पालिका प्रशासनाने तीन दिवसांपासून दवाखाने, मेडिकल वगळून पुकारलेल्या जनता कर्फ्यूच्या तिसऱ्या दिवशीही कडकडीत बंद होता. शहराच्या मुख्य बाजारपेठेसह इतर सर्व भागात, रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला. लॉकडाउनला सर्व स्तरातील व्यापारी बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सर्वच दुकाने बंद होती, बाजारही बंद ठेवण्यात आला होता. विशेषतः किराणा दुकानेही बंद होती. मनमाडकरांनी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आदेशाचे तंतोतंत पालन करत व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवून पालिका प्रशासनाला सहकार्य केले. मेन रोड गजबजलेल्या माणसांनी ओसंडून वाहणाऱ्या परिसरातील सर्व दुकाने कडकडीत बंद होती. दवाखाने, मेडिकल स्टोअर्स, डेअरी, दुकाने सुरू होती.

हेही वाचा - भय इथले कधी संपणार? नाशिकमध्ये विवाहितेसह चिमुरडीवर अत्याचार; भयंकर प्रकार 

हेही वाचा - दशक्रियाची विधी पडली महागात! वारंवार सांगूनही नियमांची एैशीतैशी; परिसरात खळबळ