तीन दिवस अभोण्यात कांदा लिलाव बंद; सर्व कांदा व्यापाऱ्यांची लिलाव बंद ठेवण्याची विनंती 

अभोणा (जि.नाशिक) : येथील कृषी उत्पन्न उपबाजार समितीत गुरुवार (ता. १७) ते शनिवार (ता. १९)पर्यंत तीन दिवस मजूरटंचाई असल्याने कांदा लिलाव बंद राहतील. अभोणा परिसरात सर्वत्र कांदालागवड सुरू असल्याने, उपबाजार समितीत काम करणारे सर्व मजूर, कांदालागवडीच्या कामात व्यस्त आहेत.

तीन दिवस अभोण्यात कांदा लिलाव बंद 

म्हणून येथील उपबाजार समितीत मजुरांचा तुटवडा भासत आहे. शिवाय मागील एक-दोन दिवसांत कांद्याची आवक अचानक वाढली. सुमारे ३५० वाहनांची आवक असल्याने मजुरांअभावी कांद्याची उचल करणे व्यापाऱ्यांनाही शक्य होत नव्हते. यासाठी सर्व कांदा व्यापाऱ्यांनी लिलाव बंद ठेवण्याची विनंती कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीकडे केली. त्यानुसार पुढील तीन दिवस कांद्याचे लिलाव बंद राहतील. सोमवार (ता. २१)पासून कांदा लिलाव नियमित सुरू होईल, अशी माहिती कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती धनंजय पवार व सचिव रवींद्र हिरे यांनी दिली.  

हेही वाचा>> अवघ्या पंचक्रोशीचे काळीज हेलावले! जेव्हा लष्करी अधिकारी 'तिरंगा' वीरपत्नी धारित्रींना सुपूर्द करतात तेव्हा...

हेही वाचा - दुर्दैवी! एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा