तीन पोलीस कर्मचारी अँटी करप्शनच्या जाळ्यात; रात्री उशिरापर्यंत कारवाईने खळबळ

सातपूर (जि.नाशिक) : वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनंतर पुन्हा एकदा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून तीन कर्मचारी ताब्यात घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे.

संशयिताकडूनच मागितली लाच

अपघातप्रकरणी संशयिताला गुन्हा मागे घेऊन अटक टाळण्यासाठी २० हजारांची लाच मागितली होती. त्यातील १३ हजार रुपये घेताना सातपूर पोलिस ठाण्यातील राहुल गायकवाड, सारंग वाघ व हिरामण सोनवणे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी विश्‍वासनगरमधील बोलकर पोलिस चौकीत सापळा रचून ताब्यात घेतले. पुढील कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती.  

हेही वाचा - सिव्हील हॉस्पीटलमधून बालिका अपहरण प्रकरणी अपहरणकर्त्याकडून खुलासा! वेगळेच सत्य समोर

तीन पोलीस कर्मचारी ताब्यात

सातपूर पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनंतर पुन्हा एकदा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून तीन कर्मचारी ताब्यात घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा - अख्खे गाव हळहळले! दोन सख्ख्या बहिणींच्या एकत्रच निघाल्या अंत्ययात्रा; पाच मुलांमधून आता तिघांचाच आधार