तूर अन् कापसाच्या काड्यांपासून रोजगार; टोपली, डालकी बनवत कारागीरांना कमाईची संधी

झोडगे  (नाशिक) : विविध प्रकारच्या पिकांच्या काड्यांपासून बनविल्या जाणाऱ्या टोपली, डालक्यांना ग्राहकांची पसंती कायम असल्याने ग्रामीण भागातील कारागीरांना रोजगाराची संधी उपलब्ध होत आहे.

सुबक व नक्षीदार टोपल्या विक्रीसाठी उपलब्ध

स्वयंपाकघरातील भाकरी, पोळी ठेवण्यापासून ते शेतशिवारातील शेतीमालासाठी आवश्यक टोपली, डालकी बनविण्याचे काम केले जात असून, आताच्या काळात प्लॅस्टिकसह विविध प्रकारच्या वस्तूंपासून आकर्षक डालक्या, टोपल्या बनविल्या जात असल्या तरी तूरखाटी, कपाशी, झिला आदींसह रानावणातील विविध प्रकारच्या झाडांच्या काड्यांपासून पारंपरिक पद्धतीन डालकी, टोपल्या बनवतात. घराघरांत गृहिणीच्या पसंतीला पारंपरिक पद्धतीने बनविलेल्या टोपल्यांना पसंती असल्याचे दिसते. शेती हंगाम संपल्यानंतर पिकांच्या उत्पादनानंतर शेतशिवारात शिल्लक राहिलेल्या तूरखाटी, पळखाटीपासून ग्रामीण भागातील कारागीर विविध प्रकारच्या, आकाराच्या सुबक व नक्षीदार टोपल्या कुशलतेने तयार करून विक्रीसाठी उपलब्ध करून देतात.

हेही वाचा > नियतीची खेळी! लेकाला जेवण घेऊन माऊली आली शेतात; आणि घरी घडले भलतेच

डालकीतील भाकरी-पोळीचे महत्त्व अबाधित

प्रत्येक घरामध्ये पोळी, भाकरी, भाजीपाला ठेवण्यासाठी, तर विविध सण-उत्साहात पूजेसाठी डालकी, टोपल्या वापरल्या जातात. भाजीपाला विक्रीसाठी, साठवणसाठी तसेच मासळी विक्रीत ते वापरतात. शेतीकामात विविध कामात मोठमोठे डालके, परडे वापरण्याची पद्धत असून, गावातील कारागीर दिवाळीनंतरच्या हंगामात मोठ्या प्रमाणावर टोपल्या, डालकी बनविण्याचे काम करताना दिसतात. हॉटेलमध्ये विविध प्रकारच्या काड्यांपासून बनविलेल्या टोपल्यांमध्ये पोळ्या, तंदुरी रोटी, भाकरी, पापड ग्राहकांना वाढण्यासाठी वापरण्यास पसंती दिसून येते. त्यामुळे घराघरांत पोचलेली टोपली हॉटेलमध्येही खवय्यांना आकर्षित करत आहेत. अलीकडे पोळ्या, भाकरी ठेवण्यासाठी प्लॅस्टिक कव्हर व आतील भाग स्टेनलेस स्टीलपासून बनवलेल्या डब्याचा वापर वाढला असला तरी डालकीतील भाकरी-पोळीचे महत्त्व अबाधित दिसून येते.

हेही वाचा > क्रूर नियती! तो' एक सेल्फीचा मोह अनावर; अन् माऊली लेकरांपासून दुरावली कायमची

ग्रामीण भागात रोजगार मिळाला. पिढ्यानपिढ्या शेतशिवारात जाऊन तुरीच्या, कपाशी, झिला आदींसह विविध पिकांच्या व झाडांच्या काड्या जमा करून आकर्षक डालक्या, टोपल्या बनविण्याचा पारंपरिक व्यवसाय असून, घरातील महिलांना गरजेनुसार विविध डालक्या, टोपल्या बनवून विक्री केली जाते. तर शेतकऱ्यांना विविध कामांसाठी लागणारे टोमे, डालके, परडे बनवतो.
-सुधीर देवरे, कारागीर झोडगे