तेलही गेले आणि तूपही गेले! राजीनामा देण्याची धमकी नगरसेविकेला महागात; राजकारणात चर्चा

सिडको (नाशिक) : स्थायी समिती सदस्यपद न दिल्यास ‘नगरसेविकापदाचा राजीनामा देऊ’, असा धमकीवजा इशारा वरिष्ठ नेतृत्वाला देणाऱ्या पतिदेवामुळे नगरसेविकेला स्थायी सदस्यपदापासून वंचित राहावे लागल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. आता स्थायी समिती सदस्यपद न मिळाल्याने ते राजीनामा कधी देतात, असाही प्रश्न काही जण त्यांना विनोदाने विचारत आहेत. 

तेलही गेले आणि तूपही गेले! 
राजकारणात संयम खूप महत्त्वाचा असतो. गडबड करणाऱ्यांना फारसा यात कुणी थारा देत नाही. नेमकी अशीच गडबड नुकत्याच झालेल्या स्थायी समिती सदस्यपदाच्या निवडीपूर्वी एका नगरसेविकेच्या पतिदेवाने केली. स्थानिक नेतृत्वाला डच्चू देत थेट मुंबईतील उच्चपदस्थ नेत्यांना डायरेक्ट मोबाईलद्वारे एसएमएस करून ‘आमचा स्थायी समिती सदस्यपदासाठी विचार न केल्यास, आम्ही नगरसेविकापदाचा राजीनामा देऊ’, असा थेट इशारा दिला. आपल्याला स्थायी समिती सदस्यपद मिळेल, अशा आविर्भावात राहणाऱ्या पतिदेवाला स्थानिक नेतृत्वाने मात्र थेट धोबीघाट दाखविल्याचे बोलले जात आहे. 

हेही वाचा - पोलिसांवर आरोप करत नाशिकमध्ये तरुणाची आत्महत्या; आत्महत्येपूर्वीचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल​

धमकीवजा इशाऱ्यामुळे नगरसेविकेचे स्थायी सदस्यपद हुकले 
स्थानिक नेतृत्वाकडून त्या नगरसेविकेचे नाव पहिल्या यादीत स्थायी समिती सदस्य म्हणून घेतले होते. मात्र, संबंधित पतिदेवाने पक्षाचा प्रोटोकॉल न पाळल्याने त्यांना या पदाला मुकावे लागले. घटनेबाबत वरिष्ठ नेतृत्वाने याबाबत नाराजी व्यक्त करून स्थानिक नेतृत्वाला या संदर्भात कळवून माहिती घेतली. स्थानिक नेतृत्वाने नगरसेविकेचे नाव स्थायी समिती सदस्य म्हणून घेतल्याचे सांगितले. मात्र, अशा प्रकारे चुकीचा पायंडा पडेल. यामुळे भविष्यात कोणीही प्रोटोकॉल तोडू नये व आगाऊपणा करू नये, म्हणून संबंधितांचे नाव ऐनवेळी काढून टाकल्याचे समजते. 

हेही वाचा -  'देवमाणूस' कडूनच कुकर्म; महिलेच्या आजारपणाचा घेतला गैरफायदा

अति घाई... 
‘अति घाई संकटात नेई’ असाच काहीसा प्रकार या नगरसेविकेच्या पतीबाबत घडला. थोडक्यात काय तर यात ‘तेलही गेले अन् तूपही गेले’ अशीच काहीशी गंमत बघायला मिळाली. आता स्थायी समिती सदस्यपद न मिळाल्याने ‘ते’ राजीनामा कधी देतात, अशी खुमासदार चर्चा ऐकायला मिळत आहे.  