तो एकच अंगावर काटा आणणारा आवाज आणि नाशिककरांना भरली धडकी

नाशिक : नाशिकच्या वकीलवाडी भागात सोमवारी झालेल्या एका आवाजाने परिसरात भीती पसरली होती. कोणालाही कळेना नेमके काय झाले..पण देवाची कृपा आणि अनेक जण बचावले अशा प्रतिक्रिया येऊ लागल्या. काय घडले नेमके?

अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती

वकीलवाडी भागात सोमवारी (ता. १) दुपारी तीनच्या सुमारस एक मोठे आंब्याचे वृक्ष कोसळले. रस्त्याच्या मधोमध वृक्ष कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. याबाबत व्यावसायिकांनी अग्निशमन दलास माहिती दिली. लिडिंग फायरमन इक्बाल शेख, किशोर पाटील, भीमाशंकर खोडे, हेमंत बेळगावकर, अशोक सरोदे आत्पकालीन देवदूत वाहन घेऊन घटनास्थळी दाखल झाले. मोठ्या वृक्षाचे कटरच्या सहाय्याने तुकडे करून रस्ता मोकळा केला. कोसळल्यानंतर वृक्ष एका दुकानाच्या भिंतीत अडकल्याने अनेक जण थोडक्यात बचावले. त्यांना पळ काढण्यास वेळ मिळाला, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. गेल्या वर्षीही येथील एक वृक्ष कोसळला होता. 

हेही वाचा - ही कसली स्टंटबाजी? पठ्ठ्याचे शेतात चक्क बिबट्यासोबत फोटोसेशन; VIDEO व्हायरल

तीन दुचाकींचे नुकसान

या घटनेत तीन दुचाकींचे नुकसान झाले. वृक्ष कोसळण्याच्या आवाजाने परिसरात भीती पसरली. एका दुकानाच्या भिंतीत वृक्ष अडकल्याने जीवितहानी टळली. रस्त्यावर पार्क केलेली मनोज आहिरे यांची दुचाकी (एमएच १५, एफबी ५६७८), धर्मेश वैद्य यांची (केए ५१, ईपी ३४७४) व रतन जांगीड यांची दुचाकी (एमएच १५, ईके १४०३) वृक्षाखाली सापडल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले.

हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच

सिमेंट वृक्षांच्या मुळाशी 
कोसळेल्या वृक्षाभोवती सिमेंटचा कठडा बनविला होता. त्यामुळे वृक्षाचे मूळ कमकुवत झाले असावे. त्यामुळे वृक्ष कोसळल्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली. अनेक ठिकाणी काँक्रिटीकरण झाल्याने पोषक गोष्टी पोचत नसल्याने वृक्षाचे मूळ कमकुवत होत असल्याचे नागरिकानी सांगितले.