त्या अकरा लाखांशी वारकरी महामंडळाचा संबंध नाही; महामंडळाच्या जिल्हाध्यक्षांचा खुलासा   

पंचवटी (नाशिक) : संत निवृत्तिनाथ संस्थान ट्रस्टला दिलेले अकरा लाख रुपये वारकरी महामंडळाने दिलेले नसून त्र्यंबकेश्‍वरला झालेल्या द्वादश ज्योतिर्लिंग सप्ताहातून उरलेली रक्कम असल्याचा खुलासा वारकरी महामंडळ मार्गदर्शक समितीचे अध्यक्ष श्रावण महाराज आहिरे व वारकरी महामंडळाचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब महाराज आहेर यांनी केला.

अकरा लाख रुपयांशी वारकरी महामंडळाचा काहीही संबंध नाही,

गेल्या आठवड्यात (ता.१९) वारकरी महामंडळाचे अध्यक्ष बंडातात्या कराडकर यांनी त्र्यंबकेश्‍वर येथील संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ समाधी मंदिराचा जीर्णोद्धार लवकर झाल्यास मंदिरासाठी सोन्याचा कळस देण्याची घोषणा करत अकरा लाखांचा धनादेशही सुपूर्द केला. माजी विश्‍वस्त संजय महाराज धोंगडे, पुंडलिक थेटे, रामभाऊ मुळाणे, जयंत महाराज गोसावी, पुरोहित संघाचे कार्यकारी अध्यक्ष मनोज थेटे आदींच्या उपस्थितीतील कार्यक्रमाबाबत वारकरी महामंडळाचे जिल्हाध्यक्ष आहेर यांनी ‘सकाळ’शी संपर्क साधून निवृत्तिनाथ ट्रस्टला दिलेल्या अकरा लाख अकरा हजार १११ रुपयांशी वारकरी महामंडळाचा काहीही संबंध नसून त्र्यंबकेश्‍वरला झालेल्या द्वादश ज्योतिर्लिंग सप्ताहातून उरलेली रक्कम असल्याचे म्हटले आहे. संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज ट्रस्टला देण्यात आलेल्या अकरा लाख रुपयांशी वारकरी महामंडळाचा काहीही संबंध नाही, तर ही रक्कम द्वादश सप्ताहातून उरलेली आहे.  

हेही वाचा - क्रूर नियती! नातेवाईकांसोबत गणेशचे ते फोटो सेशन ठरले शेवटचे; घटनेने परिसरात हळहळ

हेही वाचा - खेळ कुणाला दैवाचा कळला! लेकराचं तोंड बघायच्या आधीच वडिल देवाला प्रिय; गावात भयाण शांतता