‘त्या’ आक्षेपार्ह पोस्टमुळे नाशिकमध्ये तणाव; मुस्लिम बांधवांच्या दुखावल्या भावना

नाशिक :  हजरत ख्वाँजा गरीब नवाज यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित  केल्याबद्दल मुस्लिम बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधवांनी भद्रकाली पोलिस ठाण्यात येऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच, घोषणाबाजी केली. घडलेल्या घटनेमुळे भद्रकाली पोस्ट पोलिस ठाण्यासह जुने नाशिक परिसरात तणावाचे वातावरण होते.  

आक्षेपार्ह पोस्टमुळे जुने नाशिकमध्ये तणाव 
पोलिस उपायुक्त अमोल तांबे, सहाय्यक आयुक्त दीपाली खन्ना, मुंबई नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाले, तसेच भद्रकाली पोलिस ठाण्याचे निरीक्षक दत्ता पवार यांनी घटनास्थळी दाखल होत जमलेल्या बांधवांची समजूत काढली. त्यानंतर ज्या मोबाईल क्रमांकाने पोस्ट करण्यात आली, त्या क्रमांकधारकावर गुन्हा दाखल झाला. चौकशीसाठी संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ म्हणून पोलिस ठाण्याच्या आवरासह जुने नाशिक परिसरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला होता . 

हेही वाचा - झटपट श्रीमंतीच्या मोहात तरुणाई गुन्हेगारीकडे! द्राक्षनगरीत फोफावतेय भाईगीरीचे वेड

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, संशयितला ताब्यात घेण्यात आले आहे. - अमोल तांबे, पोलिस उपायुक्त  

हेही वाचा - एक विलक्षण प्रेम! बाभळीच्या झाडात अडकलेल्या साथीदारासाठी लांडोराची घालमेल; पाहा VIDEO