Site icon

त्र्यंबकला निवृत्तीनाथांच्या चरणी लाखो भाविक लीन, पालकमंत्र्यांच्या हस्ते महापूजा

नाशिक, ञ्यंबकेश्वर, पुढारी वृत्तसेवा 

आजपासून त्र्यंबकेश्वर यात्रोत्सवाला सुरुवात झाली असून पौषवारी निमित्ताने लाखो वारकरी त्र्यंबकेश्वर मध्ये दाखल झाले आहेत. आज पहाटे संत निवृत्तीनाथ महाराज संजीवन समाधीची महापूजा करण्यासाठी पालकमंत्री दादा भुसे सपत्नीक उपस्थित राहीले.  या महापूजेस आमदार हिरामण खोसकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. महापूजा झाल्या नंतर सभामंडपात पालकमंत्री यांनी विश्वस्तांसह स्थानिक पदाधिकारी यांच्या सोबत संवाद साधला. त्यावेळेस त्यांनी आचारसंहिता असल्याने थेट भाष्य करण्याचे टाळले. आचार संहिता संपल्या नंतर विश्वस्त आणि पदाधिकारी यांची बैठक घेऊन विचारविनीमय करण्याचे संकेत त्यांनी दिले.

दरम्यान महापूजा आटोपल्यानंतर भगवान ञ्यंबकराजाच्या मंदिरात सोवळे वस्त्र परिधान करत गर्भगृहात जाऊन जोतिर्लिंगाची पूजा केली. यावेळेस पदाधिकारी यांचा लवाजमा सोबत होता.

बेळगाव : प्राणपणाने लढूया, विजय मिळवूया! सीमाप्रश्नी न्याय मिळेपर्यंत झुंजण्याचा निर्धार

पुरे झाल्या महापूजा

मंगळवार पासून लाखो वारकरी भाविक ञ्यंबकेश्वर येथे दाखल झाले आहेत. शेकडो किलोमीटर पायी चालत ञ्यंबकेश्वर येथे आलेले व संत निवृत्तीनाथ महाराजांच्या संजीवन समाधीवर डोके टेकवण्यासाठी आतुर झालेल्या भक्तांनी रांगा लावल्या आहेत. मात्र रात्री बारा वाजेच्या सुमारास विश्वस्त मंडळाची महापूजा त्यानंतर अवघ्या काही तासात सरकारी महापूजा व या महापूजेच्या दरम्यान दोन तास दर्शन बंद राहीले. वारकरी भाविक थंडीत काकडले व त्यामुळे बस झाल्या या महापूजा अशी भावना वारक-यांनी यावेळेस व्यक्त केली आहे.

हेही वाचा :

The post त्र्यंबकला निवृत्तीनाथांच्या चरणी लाखो भाविक लीन, पालकमंत्र्यांच्या हस्ते महापूजा appeared first on पुढारी.

Exit mobile version