त्र्यंबकेश्वर-इगतपुरीत जमीन खरेदीला मुंबईकरांची पसंती; मुद्रांक वसुलीतून खरेदीचे उच्चांक मोडीत

घोटी (जि. नाशिक) : राज्य सरकारने मागील सहा माहिन्यांपासून मुद्रांक शुल्काच्या दरात दिलेल्या सवलतीचा नागरिकांनी उत्तम प्रकारे लाभ घेतल्याचे गेल्या तीन महिन्यांतील आकडेवारीतून समोर आले आहे. यातच इगतपुरी-त्र्यंबकेश्वर पर्यटनस्थळांच्या सभोवती जमीन खरेदीसाठी मुंबईकरांना भावल्याचे दिसून आले. यासह रक्ताच्या नात्यातील अथवा बक्षीसपत्राने जागा खरेदी-विक्रीतून इगतपुरी दस्त नोंदणी कार्यालयाच्या माध्यमातून १८ कोटींचा, तर त्र्यंबकेश्वरमधून चार कोटी ६३ लाख रुपये मुद्रांक वसुलीतून जानेवारी ते मार्चदरम्यान खरेदीचे उच्चांक मोडीत निघाले आहेत. 

इगतपुरी सहाय्यक निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी एक हजार ६१२, तर त्र्यंबकेश्वरमध्ये ५८१ झाली आहे. लॉकडाउनसारख्या गंभीर परिस्थितीतून सावरताना जामीन जागेतील व्यवसायाने अनेकांना तारल्याचे दिसून आले आहे. मागील वर्षी लॉकडाउनमुळे सर्वच क्षेत्रांतील अर्थकारणाचा पाया ढासळत असतानाच त्याहीदरम्यान साडेसात कोटींचा महसूल इगतपुरी, त्र्यंबकेश्वर कार्यालयातून मुद्रांक शुल्कापोटी जमा झाला होता. चालू वर्षात तीन महिन्यांतच चांगला फायदा झाला. यामुळे जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्था व नगर परिषदेस मिळणाऱ्या निधीत निश्चित वाढ होणार असल्याने राजकीय तसेच शासकीय अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. आदिवासी दुर्गम भागातून उच्च पदावर गेलेल्या आणि मुंबई-पुणे, ठाणे, रायगड आदी शहरी भागात नोकरीनिमित्ताने गेलेल्या व फार्महाउस, प्लॉट खरेदी-विक्रीसाठी चांगला प्रतिसाद दिसून आला आहे. इगतपुरीत जमिनीचे भाव तसे गगनाला भिडले असले तरी राज्य सरकारने रक्ताच्या नात्यातील व बक्षीसपत्र मुद्रांक शुल्कात अर्धा टक्का रकमेचा नात्यातील कुटुंबीयांना फायदा झाला आहे. 

हेही वाचा > दुसऱ्या लाटेत कोरोनाने बालकांना घेरले! हृदय, मेंदूवर आघात होत असल्याची बाब उघड

दस्त नोंदणी कार्यालयातून वेगवेगळ्या नागरी सुविधा देण्यात येतात. दस्त नोंदणी, दस्त प्रमाणित नक्कल देणे, जुन्या दस्त नोंदणी, विशेष कुलमुखत्यारपत्राचे अधिप्रामाण करणे, मृत्युपत्रकर्त्याच्या मृत्यूनंतर मृत्युपत्र नोंदणी करणे या सर्व सेवांतून जानेवारी ते मार्च महिन्यात चोख सेवा दिल्याने १८ कोटींचा महसूल इगतपुरी कार्यालयातून शासनास प्राप्त झाला आहे. 
- ईश्वर देवसी, दुय्यम निबंधक श्रेणी १, इगतपुरी कार्यालय  

 

हेही वाचा - आंदोलनास बसलेल्या कोरोनाबाधिताचा मृत्यू प्रकरण : दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची पत्नीची मागणी