त्र्यंबकेश्‍वरची निवृत्तिनाथांची यात्रा यंदा रद्द; वारकरी भक्तांच्या उत्साहावर पाणी 

त्र्यंबकेश्‍वर (जि.नाशिक) : दर वर्षी पौष वद्य एकादशीला निवृत्तिनाथांची यात्रा भरते. मात्र, या वर्षी कोरोनामुळे यात्रा रद्द केल्याचे शासन व प्रशासनाने जाहीर केले आहे. या वेळी ७ व ८ फेब्रुवारी अशी दोन दिवस एकादशी आहे. यात्रा झाली असती, तर पाच दिवस भाविकांची मोठी गर्दी या नगरीत झाली असती.

व्यावसायिक व वारकरी भक्तांच्या उत्साहावर पाणी

कोविडने ती थांबविली आहे. काही मानाच्या दिंड्या व त्यांचे प्रतिनिधींना हजेरी लावण्यासाठी परवानगी देण्यात असून, गर्दी करण्यासाठी मज्जाव करण्यात आला असल्याचे समजते. परंतु, खरे भक्त आपापल्या दिंड्या छोट्या प्रमाणावर घेऊन सध्या शहरात पोचत आहेत. कुशावर्त तीर्थात स्नान, त्र्यंबकेश्‍वर दर्शन व निवृत्तिनाथ समाधी दर्शन, तर काही ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा करून माघारी फिरत आहेत. दर वर्षी या यात्रेची तयारी काही दिवस आधीपासून सुरू होत असते. पालिकेसह व्यावसायिकांना चांगले उत्पन्न देणारी ही यात्रा यंदा नसल्याने व्यावसायिक व वारकरी भक्तांच्या उत्साहावर पाणी फिरले आहे.  

हेही वाचा - ही कसली स्टंटबाजी? पठ्ठ्याचे शेतात चक्क बिबट्यासोबत फोटोसेशन; VIDEO व्हायरल

हेही वाचा - बालविवाह झालेल्या 'त्या' दुर्दैवी मुलीचा मृत्यू; आईची सासू-सासऱ्यांविरोधात तक्रार